- वादग्रस्त असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचे अखेर निलंबन
दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. दीपाली चव्हाण यांना विनोद कुमार यांनी त्रास दिला होता. याविषयीची तक्रार रेड्डी यांच्याकडे होती. मात्र माहिती असूनही त्यांनी कारवाई न केल्याचा आरोप आहे. आज, मंगळवारी अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात भाजपकडून ठिया आंदोलन करण्यात आले. रेड्डी यांच्या निलंबन व अटकेची मागणी करण्यात आली. यादरम्यान अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रेड्डीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. यानंतर आज दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले.
यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
'डॅशिंग अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी वनाधिकारी रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी आज मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मा. मुख्यमंत्र्यांनी सा संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.' असे यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.