Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन दिवसात दहा लाख दंड वसूल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
file photo शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, सामाजिक अं...

file photo

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे व गर्दी न करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गैरजबाबदार नागरिकांवर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली असून दि. 19 फेब्रुवारी  ते 21 फेब्रुवारी 2021 या तीन दिवसात प्रशासनाने 1337 आस्थापनांना भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या 20 आस्थापनांवर 39 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तर मास्कचा वापर न करणाऱ्या 4625 नागरिकांकडून रु.9 लाख 86 हजार 540 दंड वसूल करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी कळविले आहे. 




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top