आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 21 ऑक्टोबर 2026) -
राजुरा शहरातील जवाहरनगर परिसरातून घरासमोर उभी असलेली मोपेड चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा तपास करत राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईत चोरीस गेलेली हिरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड, अंदाजे एक लाख रुपये किमतीची, जप्त करण्यात आली आहे.
फिर्यादी गोविंदा मदत झाडे, रा. जवाहरनगर यांच्या मालकीची हिरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड क्रमांक MH 34 BA 3464 घरासमोर उभी होती. 10 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजतापासून 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने ही मोपेड चोरून नेल्याची तक्रार त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीच्या आधारे राजुरा पोलिसांनी अप.क्र. 778/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
मोपेड चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दीपक मारोती उमरे (वय 38 वर्षे, रा. राजुरा) याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील मोपेड जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी हिरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड, नोंदणी क्रमांक MH 34 BA 3464, अंदाजे एक लाख रुपये किमतीची, जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुरा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, संजय चौधरी, विक्की निर्वाण, अनुप डांगे, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, गुडेराव पोले आणि राजीव दुबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. राजुरा पोलिसांच्या या कारवाईमुळे मोपेड चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाने केलेल्या तपासाला यश आले आहे.
#RajuraNews #RajuraPolice #Rajura #ChandrapurNews #ChandrapurPolice #MopedTheft #VehicleTheft #राजुराबातम्या #राजुरापोलीस #राजुराचंद्रपूर #चंद्रपूरबातम्या #मोपेडचोरी #वाहनचोरी #पोलीसकारवाई #आमचाविदर्भ

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.