Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डिजिटल शिक्षणाला चालना; राजुरात विद्यार्थ्यांना मोफत ‘आयडियल स्टडी ॲप’चे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अभ्यासाला तंत्रज्ञानाची जोड देत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा उपक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्टडी ॲप आमचा वि...
अभ्यासाला तंत्रज्ञानाची जोड देत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा उपक्रम
रोटरी क्लबच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्टडी ॲप
आमचा विदर्भ - वृत्तसेवा 
राजुरा (दि. ०६ ऑगस्ट २०२६) -
        स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयात रोटरी क्लब ऑफ राजुराच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’चे मोफत वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला डिजिटल माध्यमातून चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या डॉ. अफरोज बेग होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार ओमप्रकाश गोंड उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार अनिल बाळसराफ, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार डॉ. उमाकांत धोटे, जेष्ठ पत्रकार गणेश बेले, रोटरी क्लब ऑफ राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे, सचिव किशोर हिंगाणे, माजी अध्यक्ष कमल बजाज, कृष्ण कुमार तसेच ॲड. जगजीवन इंगोले उपस्थित होते.
        विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी सांगितले की, रोटरी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टडी ॲपचा विद्यार्थ्यांनी योग्य, प्रभावी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोग करावा. डिजिटल साधनांचा वापर करताना अनावश्यक स्क्रीन टाईम टाळून अभ्यासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि प्रामाणिक प्रयत्नांची साथ असेल, तर कोणतेही यश विद्यार्थ्यांपासून दूर राहू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार अनिल बाळसराफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःवरील विश्वास, वेळेचे योग्य नियोजन आणि निश्चित ध्येय यशाचे मुख्य आधार असल्याचे सांगितले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर यश निश्चित मिळते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दांत सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे सचिव किशोर हिंगाणे, किरण ढूमणे आणि नावेद बंदाली यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यास, करिअर नियोजन आणि डिजिटल शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक शिक्षिका भावना मडावी यांनी केले, तर आभारप्रदर्शन सारंग गिरसावळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. पराग डोर्लीकर, अहमद शेख, महेंद्र डाखरे, सुबोध डाहूले, अमोल कोंडावार, वृषभ गोठी, शिक्षक संतोष कुंदोजवार, अरुण मुसळे, शैलेद्र तेलंग, लता मडावी, मोनाली पाचघरे, सतीश शेंडे, सुरेश कल्पल्लीवार, रुपेश रामटेके, गौतम जुलमे, राहुल पडवेकर, बापूजी सोनूले, सुनीत लोहकरे यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, शिक्षकवृंद तसेच जिल्हा परिषद विद्यालय आणि सोनिया गांधी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची प्रभावी साधने उपलब्ध झाली असून आगामी दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी त्याचा निश्चितच लाभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

#Rajura #RotaryClubRajura #IdealStudyApp #DigitalEducation #ZPSchool #MaharashtraEducation #Class10Students #StudentSuccess #EducationNews #Chandrapur #Vidarbha #FreeEducation #DigitalLearning #AcademicExcellence #SchoolEducation #StudyApp #RotaryIndia #EducationInitiative #RajuraNews #VidarbhaNews

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top