Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पालक-शाळा सुसंवादाला नवी दिशा; राजुरात प्रेरण कार्यक्रम आणि ‘आमचे हिरो’ उपक्रम यशस्वी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरातील ब्लॅक डायमंड प्री-स्कूलमध्ये शिक्षणासोबत सामाजिक जाणीवांचे संस्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे  राजुरा (दि. 21 जुलै 2026) -         ...
राजुरातील ब्लॅक डायमंड प्री-स्कूलमध्ये शिक्षणासोबत सामाजिक जाणीवांचे संस्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. 21 जुलै 2026) -
        ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूल, राजुरा येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभानिमित्त आयोजित पालक प्रेरण कार्यक्रम (Parents’ Induction Programme) आणि ‘आमचे हिरो आणि समुदाय सहाय्यक’ हा विशेष उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पालक-शाळा सुसंवाद आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पालक, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

        कार्यक्रमाला उपमुख्याध्यापिका पूजा मॅडम, केंद्र संचालक अॅड. मनोज काकडे, ऑक्सफर्ड पब्लिकेशनचे दीपक सर तसेच शाखा प्रभारी सीमा आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकांना शाळेच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची रूपरेषा, विद्यार्थ्यांच्या आनंदी आणि सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेले नियोजन, डिजिटल माध्यमातून उपलब्ध होणारे शैक्षणिक सहाय्य तसेच पालक-शाळा भागीदारीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पालकांनी शाळेच्या शैक्षणिक नियोजनाचे, दूरदृष्टीचे आणि उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेने राबविलेल्या उपक्रमांचे स्वागत करत शाळेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या.
        विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘आमचे हिरो आणि समुदाय सहाय्यक’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पोलिस उपनिरीक्षक समीर शेख यांचे संवाद व मुलाखत सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक समीर शेख यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत निरोगी आहाराचे महत्त्व, मोबाईलचा अतिवापर टाळण्याची गरज, दैनंदिन जीवनात शिस्त आणि जबाबदारीचे पालन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि जबाबदार जीवनशैलीचे महत्त्व समजण्यास मदत झाली.

        पालक, शिक्षक आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दोन्ही उपक्रम यशस्वी ठरले. पालक-शाळा यांच्यातील परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सहभागाचे उपस्थित पालक व नागरिकांनी विशेष कौतुक केले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाखा प्रभारी सीमा आमटे यांनी शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर, जयश्री मालेकर, विधाता फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी धोटे, सचिव अॅड. मनोज काकडे, सहाय्यक शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

#BlackDiamondInternationalPreschool #Rajura #Chandrapur #Education #ParentsInductionProgram #SchoolEducation #EarlyChildhoodEducation #CommunityHelpers #StudentDevelopment #DigitalLearning #HealthyLifestyle #SchoolActivities #ParentTeacherPartnership #MaharashtraEducation #Vidarbha #RajuraNews #ChandrapurNews #SchoolEvents #Preschool #EducationNews

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top