Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा शहरात ९ ते १४ एप्रिलदरम्यान रोटरी उत्सवाची धूम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लावणी, स्पर्धा आणि मनोरंजनाने सजणार ‘रोटरी उत्सव २०२६’ आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ८ एप्रिल २०२६) -         रोटरी क्लब ऑफ राजुरा य...
लावणी, स्पर्धा आणि मनोरंजनाने सजणार ‘रोटरी उत्सव २०२६’
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ८ एप्रिल २०२६) -
        रोटरी क्लब ऑफ राजुरा यांच्या वतीने ‘रोटरी उत्सव २०२६’ चे आयोजन ९ ते १४ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. हा उत्सव श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर पार पडणार असून, स्थानिक गृहउद्योग, लघू उद्योग, हस्तकला आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

        या संदर्भात अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष कमल बजाज, सदस्य सारंग गिरसावळे, डॉ. अहेमद शेख, अजहर शेख, ॲड. जगजीवन इंगोले यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्थानिक व्यावसायिकांना अत्यल्प दरात स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून, यामुळे छोट्या उद्योजकांना मोठी संधी मिळणार आहे. 

        उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिर, जुना बसस्थानक येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक महिला व विद्यार्थिनींकडून सामूहिक लावणी नृत्य सादर करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १० एप्रिल रोजी २० वर्षांवरील महिलांसाठी मॉडेलिंग व फॅशन रॅम्प वॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रवेश विनामूल्य आहे.

        ११ एप्रिल रोजी समूह नृत्य स्पर्धा होणार असून सहभाग शुल्क ५०० रुपये ठेवण्यात आले आहे. याच दिवशी रात्री ८ वाजता ‘साधा माणूस’ फेम विलास झट्टे हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

        १२ एप्रिल रोजी एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रवेश शुल्क २०० रुपये आहे. १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता यूट्यूब स्टार रिचा साळवे हिची विशेष उपस्थिती राहणार आहे. उत्सवादरम्यान विविध दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, तंबोला हौजी, खरेदी-विक्री दालन राहणार आहे. तसेच  झुले, पेंटिंग, मेहंदी, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे. 
#RotaryUtsav2026 #RajuraEvent #RotaryClubRajura #CulturalFestival #RajuraNews #MaharashtraEvents #LocalBusinessSupport #LavaniDance #FashionShowRajura #VilasJhatte #RichaSalve #FestivalVibes #IndiaEvents #RajuraCity #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top