आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०१ ऑक्टोबर २०२५) -
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करून शासन आदेश तातडीने जारी करण्यात यावा, या मागणीसाठी सकल धनगर जमात, चंद्रपूर जिल्हा तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, अनुसूचित जमातींच्या यादीतील क्रमांक 36 मध्ये नमूद असलेली “धनगड (Dhangad)” ही जमात प्रत्यक्षात अस्तित्वातच नसून, महाराष्ट्रात केवळ “धनगर (Dhangar)” ही जमातच अस्तित्वात आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल प्रकरण क्रमांक 4919/2017 मध्ये देखील राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून ही बाब मान्य केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षण यादीत प्रत्यक्षात नसलेल्या जमातीचे नाव ठेवणे हे संविधानविरोधी असल्याचे स्पष्ट केले आहे.
धनगर समाज हा महाराष्ट्रातील स्वतंत्र आदिवासी समाज असून, “धनगड” नावाची कोणतीही जमात राज्यात कधीही अस्तित्वात नव्हती. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांतील उच्चारातील तफावतामुळे ही चूक घडली असल्याने शासनाने तातडीने शासन आदेश जारी करून अनुसूचित जमातींच्या यादीतील क्रमांक 36 मधील “धनगड (Dhangad)” या शब्दाऐवजी “धनगर (Dhangar)” असा उल्लेख करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे यांनी १७ सप्टेंबर २०२५ पासून आमरण उपोषणास सुरुवात केली असून चंद्रपूर जिल्हा धनगर समाजाने त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. शासनाने आंदोलन दडपण्यासाठी जबरदस्तीचा मार्ग अवलंबल्यास राज्यभर तसेच महाराष्ट्राबाहेरही हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल धनगर जमात, चंद्रपूर जिल्ह्याने दिला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देताना डॉक्टर मंगेश गुलवाडे, सुनील पोराटे, कैलास उराडे, डॉक्टर यशवंत कन्नमवार, निलेश काळे, प्रवीण गिलबिले, मयूर भोकरे, वामनराव मंदे, विशाल कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
#DhangarReservation #JusticeForDhangar #TribalRights #SCSTReservation #Vidarbha #Chandrapur #MaharashtraPolitics #SocialJustice #AmchaVidarbha #DhangarSamaj #drmangeshgulwade #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.