Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना येथे मुक्ती संग्राम दिनाचा उत्साह ; हुतात्म्यांच्या स्मृतीने उजळला परिसर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपच्या वतीने रुग्णांना फळवाटप कार्यक्रमाने जपली सामाजिक बांधिलकी हंसराज अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण व हुतात्म्यांना श्रद्धांजली महाराष्ट्...
भाजपच्या वतीने रुग्णांना फळवाटप कार्यक्रमाने जपली सामाजिक बांधिलकी
हंसराज अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण व हुतात्म्यांना श्रद्धांजली
महाराष्ट्र रत्न पुरस्कार विजेते निलेश ताजणे यांचा सत्कार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
कोरपना (दि. १८ सप्टेंबर २०२५) -
        मराठवाडा व राजुरा मुक्ती संग्राम दिवस कोरपना येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी हैदराबाद संस्थानाला निजामशाहीतून मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाले. त्यानंतर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

        उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लंडन येथे झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन सोहळ्यात युवा उद्योजक निलेश ताजणे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार हंसराज भैय्या अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. भाजप कोरपना तालुका यांच्या वतीने ध्वजारोहण व ग्रामीण रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        या कार्यक्रमाला माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप नेते अरुण मस्की, माजी उपनगराध्यक्ष अनिल फुलझेले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर, तालुका अध्यक्ष संजय मुसळे, युवा नेते निलेश ताजणे, राजू घरोटे, राष्ट्रवादी नेते आबिद अली, सतीश उपलंचिवार, नगरसेवक राम मोरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव शेलोकर, महादेव एकरे, महादेव जयस्वाल, जनार्धन निकोडे, केशवराव ठाकरे, अरुण डोहे, प्रशांत घरोटे, विशाल गज्जलवार, महादेव तपासे, रमेश मालेकर, कवडू जरिले, राहुल सूर्यवंशी, अमोल आसेकर, सतिश बेतावार, जयाताई धारणकर, अल्काताई रणदिवे, सौ. इंदिरा कोल्हे, गीता डोहे, वर्षा लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

#MarathwadaLiberationDay #marathvadamuktidin #rajuramuktidin #KorapnaCelebration #TributeToMartyrs #HansrajAhir #sudarshannimkar #NileshTajne #prashantgharote #MaharashtraRatna #BJPKorapna #FreedomStruggle #AzadiKaAmrit #MarathwadaHistory #korpana #korpananews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top