Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपुरात 5 व 6 सप्टेंबरला शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपुरात 5 व 6 सप्टेंबरला शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल ईद-ए-मिलाद व श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पर्यायी मार्ग निश्चित आमचा विदर्भ...
चंद्रपुरात 5 व 6 सप्टेंबरला शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल
ईद-ए-मिलाद व श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पर्यायी मार्ग निश्चित
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 1 सप्टेंबर 2025) -
        चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली तसेच 6 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी वाहतूक बदलासंबंधी आदेश निर्गमित केले असून नागरिकांनी व गणेशभक्तांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

🚦 वाहतूक बदल – 5 सप्टेंबर (ईद-ए-मिलाद जुलूस)
  • सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहील.
  • कोहिनूर ग्राउंड-दस्तगीर चौक-मिलन चौक-गांधी चौक-जयंत टॉकीज चौक-जटपुरा गेट-प्रियदर्शनी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद.
  • हा मार्ग नो-पार्किंग झोन म्हणून घोषित.
  • नागपूर, बल्लारशा, मुल, वरोरा दिशेहून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित.

🚧 वाहतूक बदल – 6 सप्टेंबर (श्री गणेश विसर्जन मिरवणूक)
  • गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर 6 सप्टेंबर सकाळी 6 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहील.
  • प्रियदर्शनी चौक-जटपुरा गेट-कस्तुरबा चौक-गांधी चौक-रामनगर-संत केवलराम चौक-रामसेतू पुल मार्गावरील सर्व वाहने बंद.
  • नागपूर, बल्लारशा, मुल, वणी, गडचांदूर, घुग्घुसकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित.
  • शहरातील नागरिकांनी सुचविलेल्या मार्गांचा वापर करावा.

🅿️ नो-पार्किंग आणि नो-हॉकर्स झोन
  • जटपुरा गेट-कस्तुरबा चौक, प्रियदर्शनी चौक-जटपुरा गेट, गांधी चौक-मिलन चौक, दस्तगीर चौक-मिलन चौक, छोटा बाजार चौक-पाताळेश्वर मंदिर यासह 12 प्रमुख मार्ग नो-पार्किंग व नो-हॉकर्स झोन म्हणून घोषित.
  • नागरिकांनी वाहने अनधिकृत ठिकाणी उभी करू नयेत.
  • रहिवाशांनी आपली वाहने जुबली हायस्कूलचे पटांगण व महानगरपालिकेजवळील पार्किंग येथे ठेवावीत.

🚙 बाहेरून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था
  • चांदा क्लब ग्राउंड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका
  • सेंट मायकल हायस्कूल, नगीनाबाग
  • सिंधी पंचायत भवन, रामनगर
  • व्यायामशाळा ग्राउंड, पठाणपुरा चौक
  • डी.एड. कॉलेज ग्राउंड, बाबुपेठ
  • महाकाली मंदिर ग्राउंड

⚠️ प्रशासनाचे आवाहन
  • नागरिकांनी व मंडळांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्पष्ट केले आहे.

#ChandrapurTrafficUpdate #EidMiladProcession #GaneshVisarjan2025 #TrafficDiversion #NoParkingZone #ChandrapurPolice #SafeProcession #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Major-changes-in-city-traffic-routes-on-September-5th-and-6th-Alternative-routes-decided-during-Eid-e-Milad-and-Shri-Ganesh-Visarjan-procession

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top