Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आ. सुधीर मुनगंटीवार – उत्सवातही जनतेच्या सेवेत तत्पर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजप पदाधिकारींसह रुग्णालयातील परिस्थितीवर थेट लक्ष आमचा विदर्भ - अनंता गोखरे  चंद्रपूर (दि. ०५ सप्टेंबर २०२५) -        गणेशोत्सवाच्या उत्सव...
भाजप पदाधिकारींसह रुग्णालयातील परिस्थितीवर थेट लक्ष
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
चंद्रपूर (दि. ०५ सप्टेंबर २०२५) -
       गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणातही जनतेच्या अडचणींना प्राधान्य देत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा कार्यतत्परतेचे दर्शन घडवले. मुल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेडसावत असलेल्या गैरसोयींबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच त्यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र लिहून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

       आ. सुधीर मुनगंटीवार यांना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुपस्थिती, रुग्णांशी असभ्य वर्तन, औषधोपचाराचा तुटवडा, तसेच नियमित आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवर गंभीर दखल घेत त्यांनी "यासंदर्भात स्वतः उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांची गैरसोय टाळण्याची योग्य कार्यवाही करावी," असे स्पष्ट निर्देश दिले. या आदेशानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी मुल उपजिल्हा रुग्णालयात पोहोचून पाहणी केली. रुग्णालयातील परिस्थितीची तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.

        या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामध्ये भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी सभापती मिलींद खोब्रागडे, प्रशांत बोबोटे, सुनील कुकुटकर, संतोष गाजुलवार, राकेश ठाकरे, सूर्यकांत सहारे आदींचा समावेश होता. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तात्काळ दखलीमुळे मुल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. जनतेच्या सेवेला प्राधान्य देणारी ही कार्यपद्धती म्हणजे जनसेवा हाच त्यांचा धर्म असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

#SudhirMungantiwar #PublicService #MulHospital #Chandrapur #Healthcare #PatientFirst #BJPLeadership #QuickAction #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top