Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कुपोषण निर्मुलन; ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांचे कार्य कौतुकास्पद - अमित महाजनवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"कुपोषण निर्मूलनासाठी बाळू फाउंडेशनचा पुढाकार" आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २७ सप्टेंबर २०२५) -         एकात्मिक बाल विकास...
"कुपोषण निर्मूलनासाठी बाळू फाउंडेशनचा पुढाकार"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
        एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राजुरा व बाळू फाउंडेशन राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायत सिर्सी येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त आहार प्रदर्शनी, पोषण रॅली तसेच स्तनदा मातांना आहाराबाबत मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.

       या प्रसंगी बाळू फाउंडेशनच्या ''कुपोषण पर सिधा – वार हम सब है तैयार'' या उपक्रमाअंतर्गत राजुरा येथील साळवे जेनेरिक मेडिकल स्टोअर्स चे संचालक प्रमोद साळवे व सौ. माधुरी प्रमोद साळवे यांच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त सिरसी येथील दोन मुलींना पोषण आहाराची “बाळू भेट” देण्यात आली. कार्यक्रमास बाळू फाउंडेशनचे अध्यक्ष अमित महाजनवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, बाळू फाउंडेशनचे सदस्य सुशील निमकर, अक्षय सुर्तेकर, पर्यवेक्षिका अंकिता वणवे, ग्रामपंचायत अधिकारी कल्याणी बांगरे, वरुर क्षेत्रातील २७ अंगणवाडींच्या सर्व अंगणवाडी सेविका तसेच प्रमोद साळवे व सौ. माधुरी साळवे उपस्थित होते.
        या वेळी कुपोषित बालकांच्या पालकांना संतुलित व पौष्टिक आहाराचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रमोद साळवे यांनी “योग्य आहाराचे मानवी जीवनातील महत्व” या विषयावर विचार मांडले. अध्यक्ष अमित महाजनवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील अंगणवाडी ही केवळ ० ते ६ वयोगटातील बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणारी संस्था नसून, पूर्वप्राथमिक शिक्षणाचे केंद्रबिंदू आहे. अंगणवाडी सेविका या देशाच्या उज्ज्वल पिढी घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचलन पूनम येरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजू नक्कावार यांनी केले.

#NutritionMonth #AnganwadiHeroes #ChildHealth #Balufoundation #RajuraUpdates #FightMalnutrition #CommunityWellbeing #BaluFoundation #AmitMahajanwar #ChildDevelopmentProjectOfficer #AmitMeshram #Anganwadiworker #SalveGenericMedicalStoresRajura #PramodSalve #MadhuriSalve #PanchayatSamitiRajura #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top