आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर / राजुरा (दि. २६ सप्टेंबर २०२५) -
राजुरा विधानसभेतील महाराष्ट्र–तेलंगणा सिमावर्ती भागामध्ये रम्मीच्या नावाखाली तीन पत्ते आणि कटपत्ता अशा स्वरूपातील जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर मुद्दा उचलून धरत शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी पोलीस उप अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्याकडे लेखी निवेदन दिले.
या भागातील शेतकरी बांधव जुगारामुळे आर्थिकदृष्ट्या देशोधडीला लागत असून, सामाजिक व्यवस्था कोलमडत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दररोज १०० ते २०० फोरव्हिलर वाहनांमधून जुगारी दाखल होतात. या अड्ड्यांवर अवैध दारू व बकऱ्याचे जेवण उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेकदा वादविवाद व जीवघेणे संघर्षदेखील घडले आहेत.
शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांनी सांगितले की, राजुरा तालुक्यातील सोनुर्ली, जिवती तालुक्यातील पाटन बोरी, गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा आणि कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे मोठ्या प्रमाणावर हे जुगार अड्डे बेकायदेशीररित्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक–सामाजिक नुकसान होत आहे. हजारे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली की, या जुगार अड्ड्यांवर तातडीने धाड टाकून जुगारबाजांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आणि सदर अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. या संदर्भातील तक्रार राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
#IllegalGambling #RajuraNews #BorderCrime #StopGambling #FarmersLoss #shivsena #banduhajare #tinpatte #cutpatta #gambling #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.