थरकाप - राजुरा-गडचांदूर मार्गावर भीषण अपघात, सहा ठार
कापनगावजवळ ट्रक-ॲटोची जोरदार टक्कर, शहरात खळबळ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 27 ऑगस्ट) –
राजुरा–गडचांदूर मार्गावरील कापनगावजवळ भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना दुपारी साधारणतः 4 वाजताच्या सुमारास घडली.
राजुरा येथून पाचगावकडे जात असलेल्या ॲटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य फलक नसल्याने ॲटो चालक चुकीच्या मार्गाने गेला. हायवावर आल्यावर समोरून आलेल्या हायवा ट्रकने धडक दिल्याने संपूर्ण ॲटोचा चुराडा झाला.
या अपघातात जागीच तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांचा मृत्यू उपचारासाठी रुग्णालयात नेताना झाला. मृतांमध्ये ॲटो चालक प्रकाश मेश्राम (वय 50, रा. पाचगाव), रवींद्र हरी बोबडे (वय 48, रा. पाचगाव), शंकर कारू पिपरे (वय 50, रा. कोची), सौ. वर्षा बंडू मांदळे (वय 41, रा. खामोना), तनु सुभाष पिंपळकर (वय 18, रा. पाचगाव), ताराबाई नानाजी पापुलवार (वय 60, रा. पाचगाव) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत निर्मला रावजी झाडे (वय 50, रा. पाचगाव) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच भोजराज महादेव कोडापे (वय 40, रा. भुरकुंडा) यांच्यावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर ट्रक क्र चालक घटनास्थळावरून फरार झाला असून राजुरा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेची दखल घेताच राजुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुमित परतेकी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
#RajuraAccident #GadchandurRoad #HighwayCrash #RoadSafety #WardhaNews #BreakingNews #ChandrapurUpdate #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.