शिक्षक साळवे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २६ ऑगस्ट २०२५) –
आदिवासी आश्रमशाळा किरमिरी येथील शिक्षक प्रमोद साळवे यांनी आपला वाढदिवस चंद्रपूर येथील डेबू सावली वृद्धाश्रम येथे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. कधी आरोग्य शिबिराचे आयोजन, कधी वृक्षारोपण तर कधी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवून आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करणारे प्रमोद साळवे यांनी यावर्षी माय-माऊलींसोबत वेळ घालवत फळवाटप करून दिवस साजरा केला. ना केक, ना पुष्पगुच्छ, ना झगमगाट… परंतु वृद्धाश्रमातील मातांसोबत आनंद वाटण्यातून “खऱ्या सेवेतला वाढदिवस” साजरा झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी गुरुदेव सेवा मंडळ राजुरा येथील तालुका सेवाधिकारी मोहनदास मेश्राम यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेतून प्रमोद साळवे बचावले आणि त्यानंतर सेवा कार्य अधिक जोमाने सुरू ठेवले आहे. दुर्गम भागातील विद्यार्थी घडविण्यापासून ते कुणालाही मदत करण्यापर्यंत ते नेहमीच पुढाकार घेतात. चंद्रभान वरारकर यांनी सांगितले की, “आपल्यासारख्या मातापित्यांची सेवा करणे हे खरे सौभाग्य आहे. पुढे मी देखील माझा वाढदिवस आपल्यासोबतच साजरा करणार.” बजरंग जेणेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी आम्ही सदैव सोबत राहू.” या कार्यक्रमासाठी वृद्धाश्रमातील माय-माऊलींसोबत आश्रमशाळा परिवारातील शिक्षक मनोज आत्राम, गोपाल बोबाटे, निलेश देठे, राहुल ब्रह्मपुरीकर तसेच प्रकल्प कार्यालय चंद्रपूरचे लेखाधिकारी जगताप आणि सहाय्यक लेखाधिकारी पाटील उपस्थित होते.
#ServiceBirthday #TeacherWithCompassion #CelebrationWithPurpose #InspirationThroughAction #ElderCareLove #SimpleLivingHighThinking #SocialResponsibility #HumanityFirst
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.