Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: काँग्रेसचा लोकहितासाठी पुढाकार – जुने मीटर परत लावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काँग्रेसचा लोकहितासाठी पुढाकार – जुने मीटर परत लावा "NSUI, युवक व महिला काँग्रेस एकत्र – स्मार्ट मीटर हटाव मोहीम!" आमचा विदर्भ - र...
काँग्रेसचा लोकहितासाठी पुढाकार – जुने मीटर परत लावा
"NSUI, युवक व महिला काँग्रेस एकत्र – स्मार्ट मीटर हटाव मोहीम!"
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. 1 ऑगस्ट २०२५) –
        शहरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामावर तात्काळ स्थगिती आणावी अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अरविंद काटकर यांना निवेदन देण्यात आले.

        निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महावितरणकडून मागील काही दिवसांपासून शहरातील जुन्या विज मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. तथापि, अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांच्या विज बिलात दुपटीने वाढ झाली आहे. तसेच काही ठिकाणी एजन्सीमार्फत ग्राहकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रकारही घडत आहे.

निवेदनात करण्यात आलेल्या मुख्य मागण्या -
  • स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तात्काळ थांबवावे.
  • आधीच ज्या घरांमध्ये व दुकानांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, तिथून स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर लावण्यात यावेत.
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष देवेंद्र आर्य, काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, काँगेस पक्षाचे पदाधिकारी भास्कर माकोडे, डॉ. सुनील कुलदीवार, नरेश मूंधड़ा, सुनंदा आत्राम, नरसिंग रेब्बावार, प्रणेश अमराज, मेहमूद पठाण, कासिम शेख, मंगेश बावणे, नरेश आनंद, नरेश बुरांडे यांचेसह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय (NSUI) व इंटक (INTUC) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी शहरवासीयांच्या वतीने प्रचंड संताप व्यक्त केला. काँग्रेसच्या या हालचालीमुळे बल्लारपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात एक नवा जनआंदोलनाचा सूर उमटत आहे.
#SmartMeterProtest #CongressAgainstSmartMeters #BallarpurNews #ElectricityBillHike #ConsumerRights #Mahavitaran #StopSmartMeters #CongressVoice #SayNoToForcedMeters #BallarpurCongress #PeopleFirst #ElectricityJustice #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur #ballarpur #ballarpurnews #ballarpurupdate

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top