Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कर्ज आणि परताव्याच्या नावाखाली खोटा स्वप्नविक्रीचा धंदा!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कर्ज आणि परताव्याच्या नावाखाली खोटा स्वप्नविक्रीचा धंदा! पतसंस्थेवर गुंतवणूकदारांचा आरोप, गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्य...
कर्ज आणि परताव्याच्या नावाखाली खोटा स्वप्नविक्रीचा धंदा!
पतसंस्थेवर गुंतवणूकदारांचा आरोप, गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन
चंद्रपूर (दि. ०१ ऑगस्ट २०२५) -
        शेगाव (बु.) येथील शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमिटेड या संस्थेने विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करत सुमारे 1 कोटी 2 लाख 73 हजार 578 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय चंद्रपूर हे तपास करीत असून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

        तक्रारदार अब्दुल रहेमान शेख इस्माईल (रा. शेगाव बु.) यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी पतसंस्थेची स्थापना झाली. स्थानिकांना एजंट व व्यवस्थापक म्हणून नियुक्त करून, मोठा परतावा, त्वरित कर्ज सुविधा, पिकनिक कर्ज, लखपती योजना इत्यादींचे आमिष दाखवून लाखो रुपयांची गुंतवणूक उभी करण्यात आली.

         या फसवणुकीसंदर्भात शेगाव बु. पोलिस स्टेशन मध्ये भारतीय न्यास संहिता कलम 318(4), 316(2), 316(5), 3(5) तसेच महाराष्ट्र संरक्षण धोका असलेल्या गुंतवणूकदारांकडून प्रकरणे (MPID) अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी करीत आहेत.

        फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, रक्कम जमा पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, राष्ट्रीयकृत बँक खात्याचे पासबुक (झेरॉक्स प्रत) आदी माहितीसह परिशिष्ट-1 प्रमाणे फॉर्म भरून आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर (दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या परिसरात) येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

#InvestmentFraud #ChandrapurNews #PoliceAppeal #CooperativeScam #ShivlakshmiScam #FinancialCrime #InvestorAlert #FraudAwareness #EconomicOffencesWing #MaharashtraNews #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top