Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 980 नागरिकांची तपासणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 980 नागरिकांची तपासणी इंडियन रेडक्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर फाउंडेशनचा आरोग्य उपक्रम आमचा विदर्भ - अनंता गोखरे चं...
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 980 नागरिकांची तपासणी
इंडियन रेडक्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर फाउंडेशनचा आरोग्य उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २१ ऑगस्ट २०२५) -
        “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्वज्ञानातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी, चंद्रपूर व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, आझाद चौक, दुर्गापूर येथे यशस्वीरीत्या पार पडले. जिल्ह्यातील नामवंत ईएनटी सर्जन तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी, चंद्रपूरचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात प्रकल्प संचालक म्हणून डॉ. पियुष मेश्राम आणि डॉ. आशिष बारब्दे यांनी विशेष योगदान दिले. शिबिरात एकूण 980 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांवर तपासणी करून रुग्णांना निशुल्क औषधांचे वाटप करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.
        शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रिजवान शेख, डॉ. मयूर वानखेडे, डॉ. वसंत ढवस, डॉ. ट्विंकल ठेंगळे, विशाल पवार, वैष्णवी सहारे, ज्योती मुरमाडकर, वृषाली चिताडे, प्रवीण आसुटकर, सोनू कातकर, निलेश पझारे, सुभाष मुरस्कर, आरिफ काझी आणि आशिष गिरडकर यांनी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा सहज व सुलभरीत्या उपलब्ध झाली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करण्यात आली.

#HealthForAll #FreeMedicalCamp #RedCrossIndia #TataCancerCare #HealthcareInitiative #ChandrapurEvents #ServiceToHumanity #DrPiyushMeshram #DrAshishBarbde #Distribution-of-free-medicines #patients #drmangeshgulwade #IndianRedCrossSociety

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top