Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूरमध्ये महिलांसाठी स्टार्टअप प्रशिक्षण मेळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरमध्ये महिलांसाठी स्टार्टअप प्रशिक्षण मेळावा ३००+ महिलांचा सहभाग, उद्योजकतेसाठी भक्कम पाऊल! यहोवा यिरे फाउंडेशनचा अभिनव उपक्रम: महिला...
चंद्रपूरमध्ये महिलांसाठी स्टार्टअप प्रशिक्षण मेळावा
३००+ महिलांचा सहभाग, उद्योजकतेसाठी भक्कम पाऊल!
यहोवा यिरे फाउंडेशनचा अभिनव उपक्रम: महिलांना मिळाले उद्योगाचे धडे
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. १४ जुलै २०२५) -
        स्टार्टअप किंवा नाविन्यपूर्ण कल्पनांना योग्य भांडवलाची जोड मिळाली, तर त्या कल्पना वास्तवात उतरू शकतात. अशाच उद्देशाने यहोवा यिरे फाउंडेशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभिमान तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “शिका – कमवा – प्रगती करा” या उपक्रमाअंतर्गत एकदिवसीय महिला उद्योग प्रशिक्षण मेळावा रामनगर चौक चंद्रपूर येथील सेंट मायकल इंग्लिश स्कूल येथे १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य परीक्षक म्हणून महाराष्ट्र औद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी नेत्रदीप चौधरी उपस्थित होते. मुख्य परीक्षक म्हणून सौ. नीता जोशी मॅडम, सौ. रेशमी (रश्मी) देशमुख मॅडम तसेच यहोवा यिरे फाउंडेशनचे सीईओ डॉक्टर रमेशकुमार बोरकुटे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन यहोवा यिरे फाउंडेशनच्या अध्यक्षा कुमारी एलिजा रमेश बोरकुटे यांनी केले होते. या उपक्रमात ३०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवून उद्योजकतेचे प्रशिक्षण घेतले. महिलांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
        यहोवा यिरे फाउंडेशन यांच्या विद्यमाने सतत असे उपक्रम राबवले जातात. अश्या अभियानाचा उद्देश महिलांना आर्थिक सक्षम बनवणे, त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअप कल्पनांना भांडवलाची जोड देणे आहे. "शिका – कमवा – प्रगती करा" या संकल्पनेवर आधारित, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून देत महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असतो. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. उद्योगाभिमुख महिलांसाठी भांडवल, मार्गदर्शन आणि व्यावसायिक शिक्षणाचे दार खुले करण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिला स्टार्टअप्स आणि लघुउद्योगांकडे वाटचाल करतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

#WomenEntrepreneurs #StartupFunding #ChandrapurEvents #ElizaBurkute #JehovahYirehFoundation #WomenEmpowerment #BusinessTraining #StartupSupport #DreamToReality #VidarbhaDevelopment #SkillIndia #Entrepreneurship #ChandrapurNews #chandrapur #chandrapurnews #aamchavidarbha #vidarbha #VidarbhaNews #JehovahYireFoundation #drrameshkumarborkute #LearnEarnProgress #PunyashlokaAhilyadeviHolkar'sprideandhonor #MaharashtraEntrepreneurshipDevelopmentCentre

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top