आमचा विदर्भ - दीपक शर्मा
नवी दिल्ली (दि. २६ जुलै २०२५) -
इन्टरनॅशनल वुमन राईट्स अँड क्राईम कंट्रोल कौन्सिल व मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण परिषद दिल्ली यांच्या विशेष कार्यक्रमात डाॅ. रमेशकुमार एस. बोरकुटे यांची "महाराष्ट्र राज्य आयुक्त – समाज कल्याण जागरूकता" या पदावर नियुक्ती करण्यात आली. डाॅ. बोरकुटे हे यहोवा यिरे फाऊंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून, शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यसनमुक्ती, पर्यावरण व महिला सशक्तीकरण क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यक्रमात मुख्य अधिकारी वि.पी. सिंग यांनी सत्कार केला. देशभरातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बोरकुटे यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांनी मनोगतात सांगितले की, “ही नियुक्ती माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर महाराष्ट्रातील समाजकल्याणासाठी कार्य करण्याची मोठी संधी आहे.”
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.