एकाच दिवशी ३० विधेयके – लोकशाहीचा नवा अध्याय
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०४ जुलै २०२५) -
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या इतिहासात दि. ४ जुलै २०२५ हा दिवस संसदीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्बल ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना करून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. ही कामगिरी केवळ नोंदवहीतील रेकॉर्डापुरती मर्यादित न राहता, ती लोकप्रतिनिधीच्या सामाजिक बांधिलकीची आणि लोकहिताच्या मुद्द्यांवरील त्याच्या संवेदनशीलतेची साक्ष देणारी ठरली आहे.
मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया:
"आजचा दिवस महाराष्ट्राच्या विधीमंडळ कार्यपद्धतीत महत्त्वाचा टप्पा आहे. मला विशेष समाधान वाटते की या ३० विधेयकांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हक्कांना अधिक बळ मिळेल. ही विधेयके केवळ कागदी दस्तऐवज नाहीत, तर ती प्रत्यक्ष जीवनात बदल घडवणारी आहेत," असे आ. मुनगंटीवार यांनी विधानभवनात बोलताना नमूद केले.
अध्यक्षांचे गौरवोद्गार:
विधेयक पुनर्स्थापनेस परवानगी देताना मा. अध्यक्ष महोदयांनी "स्पिरिट ऑफ लॉ आणि स्पिरीट ऑफ लेटर" या लोकशाही मूल्यांची आठवण करून दिली. मुनगंटीवार यांनी त्यांचे विशेष आभार मानले. "हे विधानभवन आता केवळ लक्षवेधी सभागृह न राहता लोकविचारांचे, लोकप्रश्नांचे केंद्र ठरावे, हीच माझी इच्छा आहे," असे त्यांनी नमूद केले.
विधेयकांचा विषयवस्तूवरील दृष्टिकोन:
आ. मुनगंटीवार यांनी सादर केलेली विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांशी संबंधित असून त्यामध्ये विकास, पारदर्शकता आणि समतेचा ठाम दृष्टिकोन आहे. ही विधेयके म्हणजे जनतेच्या प्रश्नांची संसदीय स्वरूपातील मांडणी आहे – अशी प्रतिक्रिया विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
लोकशाहीतील कर्तव्यनिष्ठा अधोरेखित करणारे नेतृत्व:
आ. सुधीर मुनगंटीवार हे कायमच जनतेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. या ऐतिहासिक कृतीमुळे त्यांनी विधानभवनात एक नवा अध्याय सुरू केला आहे. लोकहिताचा ध्यास, विधायक कार्याची निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण या कामगिरीतून पाहायला मिळाले.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामा.सुधीरभाऊ मुनगंटिवार हे अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत.उच्च शिक्षीत आहेत.त्यांना विधानसभेच्या कार्यपध्दतीचा अभ्यास आहे.ते लोकाभिमुख मुद्दे उचलून न्याय मिळवून देतील हि अपेक्षा आहे.
उत्तर द्याहटवा