Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपुरात दोन दिवसीय विदर्भ प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपुरात दोन दिवसीय विदर्भ प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धा ११ जिल्ह्यांतील २२७ खेळाडूंचा सहभाग आमचा विदर्भ - अनंता गोखरे  चंद्रपूर (दि. १३ जू...
चंद्रपुरात दोन दिवसीय विदर्भ प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धा
११ जिल्ह्यांतील २२७ खेळाडूंचा सहभाग
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
चंद्रपूर (दि. १३ जून २०२५) –
        विदर्भातील टेबल टेनिस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन व टेबल टेनिस असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ व १५ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे दोन दिवसीय विदर्भ प्रादेशिक टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विदर्भातील ११ जिल्ह्यांतील एकूण २२७ खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच सहभागी होणार आहेत. यासंदर्भातील माहिती टेबल टेनिस असोसिएशन ऑफ चंद्रपूरचे सचिव राकेश तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेतील प्रमुख वैशिष्ट्ये:
  • स्पर्धा ६ टेबलांवर पार पडणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अमेरिकन स्टॅक टेबल्स उपलब्ध करण्यात आले आहेत.
  • स्पर्धेत ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली, तसेच खुल्या गटातील महिला व पुरुष यांचा समावेश असेल.
  • विजेत्या व उपविजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
  • सर्व सहभागींसाठी निवास व जेवणाची व्यवस्था असोसिएशनमार्फत केली आहे.
        स्पर्धेचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विदर्भ प्रमुख अशोक राऊत, मुख्य पंच दीपक कानिटकर, आणि अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांची उपस्थिती राहणार आहे. राकेश तिवारी यांनी नमूद केले की, २०१५ नंतर तब्बल १० वर्षांनी ही स्पर्धा चंद्रपूरमध्ये पुन्हा आयोजित करण्यात येत आहे. पूर्वी केवळ ७० खेळाडू असणारा टेबल टेनिस खेळ आता ३०० खेळाडूंनी गजबजलेला आहे. त्यामुळे तरुणांमध्ये विशेष उत्साह पहायला मिळतो आहे. सदरची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेत दिनेश कोईचड, विकास महाल्ले, विनोद निखाडे, अमर भंडारवार, नेहल डांगे, अलोक बिस्वास, शुभम बावणे, रेश्मा पठाण, मनोज बंडेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top