Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुराच्या मातीतून उगम पावलेली स्वरांची गंगा – आरोही संगीत!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुराच्या मातीतून उगम पावलेली स्वरांची गंगा – आरोही संगीत! सदावर्ते दांपत्याची संगीत सेवा – एक सांस्कृतिक साखळी राजुरा (दि. ०३ जून २०२५) – ...
राजुराच्या मातीतून उगम पावलेली स्वरांची गंगा – आरोही संगीत!
सदावर्ते दांपत्याची संगीत सेवा – एक सांस्कृतिक साखळी
राजुरा (दि. ०३ जून २०२५) –
        भारतीय संगीत कलापीठ, संभाजीनगर यांच्या मान्यताप्राप्त आरोही सुगम संगीत विद्यालय, देशपांडेवाडी, येथे दिनांक १ जून रोजी गायन व वादनाच्या प्रथम ते तृतीय स्तराच्या परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या. स्वर प्रीती कला अकादमी अंतर्गत चालणाऱ्या या विद्यालयाच्या केंद्रप्रमुख म्हणून राजुराभूषण पुरस्कारप्राप्त सौ. अलका दिलीप सदावर्ते या कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन स्वर प्रीती कला अकादमीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी केले होते. परीक्षेसाठी संगीत विशारद स्नेहा बाविस्कर (वर्धा) या परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. अलका सदावर्ते यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “आमच्या विद्यालयात ५ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतचे विद्यार्थी गायन आणि वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी संगीत शिक्षण खुले आहे.”
        परीक्षक स्नेहा बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांची तयारी समाधानकारक असल्याचे सांगत, “राजुरा परिसरात सदावर्ते दांपत्य सांस्कृतिक वारसा जपत आहे,” असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात अक्षता व पुष्पवृष्टी करून पारंपरिक पद्धतीने परीक्षकांचे स्वागत करण्यात आले. संचालन ज्योती कोरडे, तर आभारप्रदर्शन लता कोळपे यांनी केले. चंद्रपूर येथील अँड. भावना हस्तक यांच्या केंद्रावरही या परीक्षांचे आयोजन झाले. आयोजनासाठी स्वतंत्र शुक्ला, छोटू सोमलकर, अंजया कणकम, कौस्तुभ गेडाम यांचे सहकार्य लाभले. 

        या परीक्षेत विना देशकर, प्रतिभा भावे, अर्चना जुनघरे, स्वरा मारोटकर, आरुषी डवरे, रेखा रागीट, रचना देवगडे, सुनिता कुंभारे, स्नेहा वाटेकर, पुष्पा भाके, आम्रपाली नळे, ज्योती कोरडे, लता कुळमेथे, हर्षाली मोहर्ले, पायल ताजणे, आशा वाटेकर, ललिता पिदुरकर, निर्मला बांगडे, पलक टिचकुले, वैष्णो दाभाडे, आद्या जंजिरा, त्रिशा शुक्ला, त्विषा जिद्देवार, कविता पचारे इत्यादीनी भाग घेतला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top