ट्रकच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा करून अंत
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 30 जून 2025) -
राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. आपल्या मुलीला बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल करणाऱ्या दौलत जंगू कुळमेथे वय 65 वर्षे, रा. भुरकुंडा (बूज) यांचा ट्रक क्र. MH 40 AK 0659 च्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतक दौलत कुळमेथे हे पत्नीसमवेत रुग्णालयात आले होते. मुलीला दाखल करून ते बाहेर येऊन चहा पिण्यासाठी दवाखान्यातून बाहेर निघाले. मात्र रुग्णालयासमोर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या ऑटो व अन्य गाड्यांमुळे त्यांना रस्त्यावरून येणारा ट्रक दिसला नाही. अचानकपणे समोर आल्याने ट्रकचालकाला गाडी थांबवता आली नाही आणि ट्रकचे चाक थेट दौलत कुळमेथे यांच्या पोटावरून गेले. रुग्णालयात नेल्यानंतर काही मिनिटांत त्यांचा करून अंत झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकीकडे घरात नव्या जीवाच्या आगमनासाठी आनंदाची तयारी सुरु असताना दुसरीकडे वृद्धाचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली. "आजोबा गेला, नातू झाला" ही ग्रामीण म्हण या प्रसंगात शब्दशः खरी ठरली.
शहरात वाहनतळांचा अभाव, अतिक्रमण व व्यापारी प्रतिष्ठानांसमोर उभी केलेली वाहने यामुळे रस्ते अरुंद झाले असून नागरिकांचे जीव संकटात सापडले आहेत. राजुरा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून, वाहनतळाची कोणतीही सुविधा नाही. नगरपालिका प्रशासन व पोलीस विभाग यांचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात अशा दुर्घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.