Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरच्या स्पंदन रोहणकरची NDA Flying Officer पदासाठी निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरच्या स्पंदन रोहणकरची NDA Flying Officer पदासाठी निवड राष्ट्रीय स्तरावर २५५ वा क्रमांक आमचा विदर्भ - अनंता गोखरे  चंद्रपूर (दि. १३ जू...
चंद्रपूरच्या स्पंदन रोहणकरची NDA Flying Officer पदासाठी निवड
राष्ट्रीय स्तरावर २५५ वा क्रमांक
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
चंद्रपूर (दि. १३ जून २०२५) –
        जिल्ह्यातील स्पंदन विजय रोहणकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षेत यश मिळवत एअर फोर्स फ्लाइंग ऑफिसर पदासाठी निवड करून राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. त्याने २५५ वा क्रमांक मिळवून चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भाचे नाव उज्ज्वल केले आहे.

        स्पंदनच्या यशाबद्दल औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विविध संस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. अशोक उईके आणि आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सीडीसीसी बँकेच्या सभागृहात त्याचा सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या गेल्या. स्पंदनने आपले शिक्षण चांदा पब्लिक स्कूल (इयत्ता १ ली ते ८ वी), सैनिकी शाळा बल्लारशाह (९ वी-१० वी), आणि एसपीआय औरंगाबाद (११ वी-१२ वी) येथे पूर्ण केले. त्याने १२ वी नंतर NDA परीक्षा उत्तीर्ण करत भारतात २५५ वा क्रमांक मिळवला.

        स्पंदनच्या यशामागे त्याचे कुटुंब मोठ्या आधारस्तंभासारखे उभे राहिले. वडील विजय रोहणकर हे प्राध्यापक, आई एक वृत्तपत्राची संपादक तर आजोबा डी.के. आरीकर हे ख्यातनाम समाजसेवक आहेत. स्पंदनने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आजी-आजोबा आणि शिक्षकवर्गाला दिले असून, "देशसेवा हीच माझी प्रामाणिक जबाबदारी" असल्याचे भावनिक उद्गार काढले. त्याच्या या गौरवपूर्ण निवडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आणि विदर्भात आनंदाची लाट पसरली आहे. विविध स्तरांतील सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top