देशी दारूच्या दलदलीत रमाबाई वॉर्ड
दारूविक्रीला महिलांचा विरोध
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०३ मे २०२५) -
स्थानिक रमाबाई वार्ड क्रमांक १६ मध्ये अवैध देशी दारू विक्रीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दारू विक्रीमुळे परिसरातील महिला आणि विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या रमाबाई वॉर्डातील महिलांनी राजुरा पोलिस ठाण्यात धडक देत ठोस कारवाईची मागणी केली आहे. महिलांनी दिलेल्या निवेदनात, वार्डातील ५ देशी दारू विक्रेत्यांची नावे नमूद करण्यात आली असून, या विक्रेत्यांनी महिलांना जाब विचारल्यावर अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. यामुळे संतप्त महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत रमाबाई वार्डात खुलेआम दारू विक्री सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर टवाळखोरांचे टोळके बसून पत्ते खेळत असते. याचा थेट त्रास महिला आणि मुलींना होतो आहे. अनेक तरुण मुलं दारूच्या आहारी जात आहेत, घराघरांत भांडणं सुरू झाली आहेत. महिलांनी राजुरा पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन अधिकारी आयपीएस अनिकेत हिरडे यांना निवेदन दिले असून, चंद्रपूर पोलिस अधीक्षक आणि उत्पाद शुल्क विभागालाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
रमाबाई नगर येथील पाचही दारू विक्रेत्यांविरूध्द तातडीने कार्यवाही करावी आणि वॉर्डातून अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी रमाबाई वार्डातील माजी नप सभापती प्रियदर्शनी उमरे, सुवर्णा दुबे, ज्योती लबडे, आशा श्रृंगारे, प्रतिभा रत्नपारखी, संगीता नगराळे, तुळशीबाग खडसे, कांचन बारसिंगे, सरिता बोरडे, बबीता करमनकर, पोर्णिमा खंडाते, ज्योती तेलंग, वैशाली गेडाम, त्रिशला ढोके, हिरकना सातपूते, संगीता नगराळे, तिलोतमा उमरे, प्रज्ञा देठे, उषा आत्राम, शितल बनसोड, किरण खंडाते,जोया पठाण, सुमित्रा वाघमारे, वत्सला तेलंग, गीता बारसिंगे, मंदा रामटेके, अरूण मडावी, रत्नमाला वाघमारे, प्रियंका ठाकूर, सुमित्रा वाघमारे यांनी निवेदनाच्या मार्फत केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.