Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: MD Drugs विक्री प्रकरण एक आरोपी अटकेत, 1.15 लाख रुपयांचा माल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
MD Drugs विक्री प्रकरण एक आरोपी अटकेत, 1.15 लाख रुपयांचा माल जप्त आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. १५ मे २०२५) -         चंद्रपूर शहर...
MD Drugs विक्री प्रकरण
एक आरोपी अटकेत, 1.15 लाख रुपयांचा माल जप्त
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. १५ मे २०२५) -
        चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बाबुपेठ वार्डातील शासकीय डी. एड. कॉलेज ग्राउंड परिसरात छापा टाकत अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. आरोपीचे नाव महेश सुबोध बाला वय २४ वर्षे, रा. जुनोना चौक, बाबुपेठ वार्ड असे आहे.

         पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये सुमारे ९.०४० ग्रॅम MD Drugs पावडर किंमत ४५,०००/- रुपये आणि एक मोपेड दुचाकी सुझुकी एसेस क्र. एमएच ३४ सीई-७१९५, किंमत ७०,०००/- रुपये असा एकूण १,१५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४४/२०२५ अंतर्गत NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

       ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोउपनि संदीप बच्छिरे, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय धोटे, नापोअ कपुरचंद खैरवार, पोअ. इमरान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मपोशि सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांचा समावेश होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top