Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Cattle smuggling गोवंश तस्करी : १६ गोवंशाची सुटका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Cattle smuggling गोवंश तस्करी : १६ गोवंशाची सुटका तीन आरोपी अटकेत, एक फरार ; १२.४० लाखाचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्र...
Cattle smuggling गोवंश तस्करी : १६ गोवंशाची सुटका
तीन आरोपी अटकेत, एक फरार ; १२.४० लाखाचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ०१ मार्च २०२५) -
        महाराष्ट्रातून शेजारच्या तेलंगणा राज्यात गोवंशाची तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी गडचांदूर- पाटण जिवती मार्गावर नाकाबंदी करून दोन वाहनांमधून ३ आरोपींना अटक करून वाहन व गुरासह १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई गडचांदूर पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ३ वाजता इसापूर बसस्थानकाजवळ केली.

        गडचांदूर पोलीस २७ फेब्रुवारीच्या रात्री गस्त घालत होते. यावेळी गडचांदूर- पाटण जिवती रस्त्यावरून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस पथकाने इसापूर बसस्थानकाजवळ नाकाबंदी लावली. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास वरझडी गावाकडून पांढऱ्या रंगाची पिकअप येताना दिसली. त्या आधारे पोलिसांनी पिकअप क्रं. एमएच ३४ बीझेड ५६१९ गाडी अडवली. त्याच्या मागे येत अशोक लेलँड क्रं एम एच ३४ बी झेड ७९९४ ला देखील अडवले. मात्र अशोक लेलँडचा चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला. पोलिसांनी आरोपी तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर येथील कदीर रजाक शेख (२७) रा. जैनूर जि. असिफाबाद (तेलंगणा), चालक लाल मोहम्मद जैनुद्दीन शेख (३५) आंबेझरी ता. जिवती आणि अमीन शब्बीर शेख (२४) रा. घुग्घुस) यांना अटक केली. जुनेद रशीद शेख, रा. गडचांदूर हा फरार झाला. पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या ताडपत्री काढून त्यांची झडती घेतली असता पिकअपमध्ये ९ आणि अशोक लेलँड वाहनातील ७ अशा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १६ गोवंश, चारा व पाण्याची सोय नसताना वाहतूक करत होत्या. चौकशीत आरोपींनी ही जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे सांगितले. या आधारे पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीची गुरे आणि १० लाख रुपये किमतीची दोन वाहने, असा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असून आरोपींविरुद्ध कलम ९, ५ ( ब ), ५ ( अ ) ( १ ), ११, ११(१) (एच), ११(१)(ड) महाराष्ट्र पशुपालन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवालदार ज्ञानेश्वर मडावी तपास करत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top