आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ डिसेंबर २०२४) -
नुकत्याच झालेल्या पुणे बालेवाडी येथे ओकिनावा मार्शल आर्ट व कराटे शोटोकाई इंडिया या संस्थेमार्फत 27 वी ओकिनावा मार्शल आर्ट नॅशनल चॅम्पियनशिप दिनांक 28 नोव्हेंबर 24 ते दिनांक एक डिसेंबर 2024 रोजी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पुणे बालेवाडी येथे प्रतियोगिता आयोजित करण्यात आली या प्रतियोगिता मध्ये प्रशिक्षक प्रकाश पचारे यांच्या ओकिनावा मार्शल आर्ट्स स्कूल राजुऱ्याच्या विद्यार्थ्यांनी सहभाग होत विविध वयोगटात सुयश संपादन करून शहराचे नाव उंचावले आहे. (Adv Wamanrao Chatap)
ओकिनावा मार्शल आर्ट 27व्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये विविध राज्याचा समावेश असून यामध्ये ओकिनावा मार्शल आर्ट स्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात भाग घेत सूयश संपादन केले आहे. प्रथमेश पचारे सुवर्णपदक, ओम चुंबले सुवर्णपदक तक्षू कडूकर सुवर्णपदकाचे मानकरी ठरले कुमारी, वेदांती रागीट रजत पदक, सुरेखा अलोने, रजत पदक, प्रगती जेनेकर कास्यपदक, तनवी रामटेके कास्यपदक, आराध्या चांदेकर कास्य पदक तसेच प्रशिक्षक, प्रकाश पचारे या सर्व विद्यार्थ्यांच्या व प्रशिक्षकांच्या घवघवीत यश प्राप्ती बद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड वामनराव चटप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस, ॲड दीपक चटप (Adv Deepak Chatap), कपिल इदे, भाऊजी कन्नाके, बंडू देठे, दिलीप देरकर, पुंडलिक वाढई, नरेंद्र मोहारे, खुशाल अडवे, स्वप्नील वाढई, सचिन कुडे, वैभव अडवे, अनिल बाळसराफ, सूरज गव्हाणे, उत्पल गोरे, सौरभ मादासवार आदी उपस्थित होते
#Karate #OkinawaMartialArtsandKarateShotokaiIndia #SelfDefenseTraining #Personalitydevelopment #confidencebuilding #stayingsafeinsituationsofvulnerability #Pune #Rajura #rajura #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #27thOkinawaMartialArtsNationalChampionship #OkinawaMartialArtsSchoolRajura #AdvWamanraoChatap #AdvDeepakChatap
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.