Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वन विभागाची कारवाई आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०४ नोव्हेंबर २०२४) -         वनपरिक्षेत्र राजुरा उपक्षेत्र राजुरा नियतक्षेत्र सुमठाण...
वन विभागाची कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०४ नोव्हेंबर २०२४) -
        वनपरिक्षेत्र राजुरा उपक्षेत्र राजुरा नियतक्षेत्र सुमठाणा राखीव वनखंड क्रमांक 154 मध्ये  अवैधरित्या रेती उत्खनन होत असल्या बाबत गुप्त माहिती मिळाल्यावरून वन कर्मचारी यांनी सापडा रचून रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर क्रमांक MH-34 CD-0347 व ट्रॉली क्रमांक MH-34 CD-2203 पकडुन जप्त करण्यात आले व ट्रॅक्टर मालक अविनाश बापूजी टोंगे रा. राजुरा व इतर आरोपी विरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला. सदरची कार्यवाही राजुराचे उपविभागीय वन अधिकारी जोंग साहेब (आयएफएस) यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. येलकेवाड यांच्या नेतृत्वात वनक्षेत्र सहाय्यक एस.एम. संगमवार, नियत वनरक्षक एस. आय. तोडासे, एस.व्ही. गजलवार, पी.ए. मंदुलवार, पी.ड्ब्लू. देशमुख व रोजंदारी मजदुरांनी केली. पुढील कारवाई वन विभागातर्फे करण्यात येत आहे.

#Forest #RetiTaskari #VanVibhag #ForestDepartment #ForestRangeRajura #IllegalsandSmugling #Tractor

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top