आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२४) -
जैतापूर येथे श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळाच्या वतीने कार्तिकी एकादशी निमीत्य सद्गुरू नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ मागील एकोणतीस वर्षापासून दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. (दि. १२) रोज बुधवारला आयोजित गोपाल काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. सदगुरू माणिक रोकडे महाराज यांनी सांगितले की, भक्तिमार्ग मानवी जीवनाचे कल्याण करणारा मार्ग आहे. आजच्या नवीन पिढीला अध्यात्माचा अभ्यास करीत असताना शास्त्रीय व वैज्ञानिक दाखल्यांचा खुलासा करून देत त्यांना भक्तिमार्ग पटवून देणे आवश्यक आहे. भक्तिमार्गात आलेल्या भक्तांना मुख्य अनुभव येतो तो तणाव मुक्तीचा. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वारीमुळं वारकरी किंवा भक्तगण त्यांच्या जीवनातील अडीअडचणी आणि समस्या विसरून जातात पांडुरंगाच्या चरणी तल्लीन होऊन जातात. त्यामुळं त्यांच्यावरील असलेला तणाव हा निघून जातो आणि जगण्यातला पुन्हा एकदा आनंद आणि उत्साह त्यांच्यात संचारला जातो. त्या दृष्टीनं भक्तिमार्ग हा खूप महत्त्वाचा आणि लाभदायक ठरते असे सांगितले.
कार्तिकी वारीचं महत्त्व सांगताना ह.भ.प रामचंद्र गोहोकार महाराज सांगतात की, "पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतात की बाबा तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कष्टकरी आहात. आज वारकरी सगळे कष्ट करीत आहे. त्यांनी प्रत्येक वारी करावी अशी अपेक्षा आहे. पण प्रत्येक वारीला सर्वांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळं येता येईल अशी शक्यता नाही. पण पांडुरंग सांगतात 'किमान आषाढी कार्तिकीला विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग'.. हे गुज स्वतः पांडुरंग सांगतात. हा असा देव आहे की कधी कुणाला काही देत नाही आणि कोणाकडून काही घेत नाही याच्याकडे केवळ प्रेमाचा व्यवहार आहे. प्रेम सुख देई, प्रेम देई समाधान. जिथे प्रेमाचं नातं असतं तिथं अपेक्षा नसते आणि जिथे अपेक्षा नसते तिथे अपेक्षाभंग नसतो. म्हणून पांडुरंगाचे भक्त आपल्याला सदैव आनंदी असलेले दिसतात, असे ह.भ.प. गोहोकार महाराज यांनी सांगितलं.
मागील एकोणतीस वर्षापासून जैतापूर येथिल श्री गुरुदेव दत्त सांप्रदाय मंडळ व जैतापूर ग्रामवसी दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करीत असते. यात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडत आहे. यादवराव तुंबडे यांनी पहाटेची काकड आरती केली. कीर्तन महोत्सवात हार्मोनियम वादक भवन चौधरी, मृदंग वादक समीर वैद्य, भाऊराव चतुरकर, प्रज्वल तूरानकर, गायक वसंता बोबडे, काटवले, डॉ. किरमिरे, गणपत झाडे, प्रेमनाथ पानघाटे, गणपत आवारी याचा सहभाग होता. दहीहंडी दत्त संप्रदायाचे दाता अशोक साखरकर यांनी फोडली. सद्गुरू नामदेव रोकडे यांच्या पालखी सोहळ्यात गडचांदुर, रामपूर, गोवरी, मारडा, एकोडी, जैतापूर येथील दिंड्या व भजन मंडळींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
या कार्यक्रमाला श्री गुरुदेव दत्त मंडळाचे विलास खारकर, संतोष धांडे, राजू चौधरी, सुनील खारकर, प्रविण थेरे, प्रदीप गोरे, भास्कर फोफरे, शंकर गोरे, साईनाथ आत्राम, सदाशिव फोफरे, मुरलीधर थेरे, सुधाकर गोरे, मनोहर धांडे, ज्ञानेश्वर बेरड, महादेव चौधरी, पुरुषोत्तम गोनेवार, लटारी धांडे, संतोष उरकुंडे, शंकर लोनगाडगे, दौलत धांडे, पुरुषोत्तम निब्रड, साईनाथ फोफरे, मारोती फोफरे, श्रीहरी धांडे, सुनील आत्राम, देवराव धांडे, गणपत मडावी, पवन हनुमंते, वसंता गोनेवार, हरी निब्रड, योगीराज ताजने, प्रफुल थेरे, अशोक खुसपुरे सह जैतापूर ग्रामवासियांनी सहकार्य केले.
Advertisement

Related Posts
- राजुरात फुटलेला चेंबर दोन आठवड्यांपासून उघडाच11 Aug 20250
राजुरात फुटलेला चेंबर दोन आठवड्यांपासून उघडाचनागरिकांना अपघाताचा धोका, प्रकाशव्यवस्था देखील नाहीआमचा...Read more »
- "आरोग्यधोक्यावर मनसे महिला सेनेची भूमिका ठाम"11 Aug 20250
"आरोग्यधोक्यावर मनसे महिला सेनेची भूमिका ठाम"सोनिया नगर येथील घनकचरा प्रकल्प स्थानांतरित कराआमचा विद...Read more »
- सलग २२ वर्षे सुरू असलेला रक्षाबंधनातून सामाजिक ऐक्याचा संदेश11 Aug 20250
सलग २२ वर्षे सुरू असलेला रक्षाबंधनातून सामाजिक ऐक्याचा संदेशमाजी आमदार सुदर्शन निमकर यांचा परंपरा जप...Read more »
- बहिणींनी दिले वृक्ष संगोपनाचे वचन11 Aug 20251
बहिणींनी दिले वृक्ष संगोपनाचे वचनराष्ट्रीय पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव वेगळ्या पद्धतीने साज...Read more »
- आदिवासी संस्कृती, परंपरा, जीवनशैली आणि निसर्गाशी असलेले नाते हे आपल्या वारशाचा अविभाज्य भाग - अरुण धोटे10 Aug 20250
आदिवासी संस्कृती, परंपरा, जीवनशैली आणि निसर्गाशी असलेले नाते हे आपल्या वारशाचा अविभाज्य भाग - अरुण ध...Read more »
- स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांचा अभाव ग्रामस्थांना चटका लावणारा09 Aug 20250
स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांचा अभाव ग्रामस्थांना चटका लावणाराशेवटचा प्रवासही कष्टमय, मृतदेह उचल...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.