Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वर्धा नदीजवळ बांधकाम सुरु असलेला पुलाचा पिलर कोसळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नित्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ; कामगार जख्मी आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २५ नोव्हेंबर २०२४) -        येथून जवळच असलेल्य...
नित्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ; कामगार जख्मी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ नोव्हेंबर २०२४) -
       येथून जवळच असलेल्या वर्धा नदीजवळ नॅशनल हायवेच्या तर्फे वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. रविवारी सकाळी काम सुरू असताना पुलाचा पिलर सकाळी कोसळला. या अपघातात काही कामगार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. कोट्यावधी रुपये खर्ची करून बांधण्यात येणाऱ्या या पुलाचे पिलर खचल्याने बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला जात आहे. 

        निकृष्ट दर्जाचे तंत्रज्ञान आणि अनियोजितपणामुळे सुरू असलेले पुलाच्या पिल्लर चे काम सुरू असताना अचानक पडले. अभियंता वरती पाहणी करण्यासाठी गेले होते, वर्धा नदीच्या पात्रा काठी महामार्गाचे काम सुरू आहे. अती महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली आहे. करोडो रुपये खर्च करून असे काम होत असेल तर याची चौकशी करून नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांनी कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या बाबत जीआर इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता कोणी फोन उचलला नाही. घटनास्थळी एक अभियंता होते ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी अनेक संघटनांनी केली आहे. पुल झाल्यानंतर घटना झाली तर अनेकांचे प्राण जाऊ शकते, 

चौकशी करून कारवाई करू 
ठाणेदार योगेश्वर पारधी राजुरा चे ठाणेदार योगेश्वर पारधी याना विचारले असता त्यांनी सांगितले की चौकशीत ठेवले असून सुरक्षितता दृष्टीने कंपनी ने काय उपाययोजना केली याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.

#aamchavidarbha #Wardhanadi #Wardhariver #Pool #Pillar #PoorqualityConstructionwork #pillarcollapsed #MLADevraoBhongle #GRINFRACOMPANY #PoliceStationRajura #Rajura

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top