Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महिलांनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा" लाभ घ्यावा - शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि.०२ जुलै २०२४) -         महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद...

राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि.०२ जुलै २०२४) -
        महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, दुर्बल घटकांसाठी अनेक योजनायोजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. यामुळे राज्यातील जनता व विशेष करून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. राज्य सरकारने विविध लोकोपयोगी योजना राबविल्या असून राज्य सरकारतर्फे घोषित योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्र परिषदेतून केले आहे. शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये महिलांसह गोरगरीब व शेतकऱ्यांना झुकते माप दिल्या गेले. राज्यातील दोन लाख पाच हजार मुलींना पदवी पर्यंत मोफत शिक्षण, अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्यागाठी दीड हजार रुपयांची थेट मदत, महिलांना वर्षातून तीन मोफत सिलेंडर, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला मोफत वीज, मागील त्याला वीज, मागील त्याला सौर ऊर्जा पंप, दुधालाल लिटरमागे पाच रुपये अनुदान अशा घोषणा महायुती सरकारने 25 व्या अंअर्थसंकल्पात केल्या आहेत. अर्थसंकल्पात माय माऊली व बळीराजासाठी घोषणा आणि निधीचा प्रचंड वर्षाव करण्यात आल्याची माहिती हजारे यांनी यावेळी दिली.  

       शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाचे निर्णय घेतल्याने लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये प्रतिमाह मिळणार आहे. नोंदणीकृत विवाह करणारे महिलांना 10000 रुपयाऐवजी 25 हजाराचे अनुदान मिळणार आहे. तसेच आठ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100% शुल्क माफ केले आहे. यामुळे राज्यातील महिला विद्यार्थी व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बंडू हजारे यांनी केले. यावेळी पत्र परिषदेला जिल्हा संघटक युवराज धानोरकर, प्रतिमा ठाकूर, शहर प्रमुख भारत गुप्ता, मीनल लाही आदींची उपस्थिती होती

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #shivsena #eknathshinde #chiefminister #mukhyamantrimajhiladakibahinyojna #ShivSenajilhapramukhBanduHazare #Monsoonsession #MaharashtraState #womens #students #Farmers #agriculturallabourers #labourers #women #weakersections #Freeeducation #BanduHazare


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top