गोवरी-पौनी प्रकल्पातील आर्थिक मोबदला बिलाला लवकरच अंतिम मंजुरी
अनुकंपा प्रकरणात विवाहितेच्या व मृतक नोकरी धारकाच्या भाऊ व बहीणीस नोकरीचा निर्णय लवकरच
हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना मिळाले भरीव यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 19 जून 2024) -
वेकोलिच्या विविध क्षेत्राशी निगडीत प्रकल्पग्रस्त शेतकन्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न, समस्यांच्या निवारणार्थ सुनावणी, बैठक व बृहत पत्रव्यवहार व सतत पाठपुराव्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर याना यश मिळाले असून दि. 17 जून 2024 रोजी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेत नागपुरातील वेकोलि विश्रामगृहात वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक (सीएमडी) व अन्य वरिष्ठांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध महत्वपुर्ण प्रलंबित समस्यांचे निराकरण झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरली आहे. सदर बैठकीस वेकोलि मुख्यमहाप्रबंधक (भूमि) व (औ.स.) माजी आमदार सुदर्शन निमकर, विनोद शेरकी, अँड. इंजी. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, मधुकर नरड, पवन एकरे, माजी सरपंच बंडु रायपुरे, कोलगांवचे उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडसकर, लक्ष्मण बोढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वेकोलि प्रबंधनाने सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पातील नोकरीचे प्रस्ताव या महिनाभरात स्वीकारण्यास अनुमती दिली. गोवरी पोवनी प्रकल्पातील आर्थिक मोबदला देयकास अंतिम मंजूरीही जून महिन्यातच देण्याचे मुख्यालयाने मान्य केले. गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन 4 करीता लवकरच प्रस्तावित करण्याचे तसेच भूमि अधिग्रहण प्रकल्पातील ग्रैंड डॉटर (नात) मुलीचा मुलगा/मुलगी व सुनेच्या नोकरीविषयी लवकरच निर्णय होवून अनुकंपा नोकरीत विवाहीत मुलीच्या तसेच मृतक नामनिर्देशीताचा भाऊ, बहीण यांना नोकरी देण्याविषयी मुख्यालयीन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याची माहिती सीएमडी यांनी हंसराज अहीर यांना या बैठकीत दिली.
न्यायालयीन प्रकरणातील प्रलंबित नोकऱ्या मार्गी लावण्यास गुणवत्ता प्राधान्य प्रकरणामध्ये निर्णय घेण्याबाबत ठोस धोरण स्वीकारले जाईल, भूमिगत खाणीतून सुरक्षा प्रहरीकरीता आवेदन केलेल्या कामगारांची कॅडर बदल विषयक सुची प्रकीयाधीन असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही बैठकीत आश्वस्त करण्यात आले. या व्यतिरिक्त पोवनी, सास्ती, सोनुर्ली गावातील उर्वरीत जमिनीचे अधिग्रहण, सीएमपीडीआयएल द्वारा सव्र्व्हेक्षण करुन तातडीने अंमल करण्याच्या सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी केल्या. यावेळी भटाळी, पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक सातबारा व 2 एकर पेक्षा अधिक तसेच दोन आराजी असल्यास फेरफार प्रक्रियेनंतर 2 नोकऱ्या देण्यास अडचण नसल्याचे ही प्रबंधनाने या बैठकीत स्पष्ट केले. तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात प्रलंबित नोकरी प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीत या व्यतिरिक्त अनेक महत्वपुर्ण विषयांवर शिक्कामोर्तब झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतोष व्यक्त होत आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #wcl #ballarpurarea #hansrajahir #wclprojectaffected #SastiExpansionProject #AcquisitionoflandinvillagePouniSastiSonurli #sudarshannimkar #prashantgharote
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.