आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 28 मे 2024) -
बल्लारपूर वेकोलि परिसरातील सास्ती खुल्या खाणीत काम करणारा सुरक्षा रक्षक सोहेल खान हा गेल्या पाच दिवसांपासून कामावर असताना अचानक बेपत्ता झाला होता. तपास मोहिमेदरम्यान दुपारी 3.30 वाजताचा सुमारास सोहेलचा मृतदेह खाणीच्या डम्पिंग यार्डच्या मातीत आढळून आला.
दि. 24 मे रोजी ड्युटीवर असताना सुरक्षा रक्षक बेपत्ता झाला होता. वेकोलि प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सोहेल ची तपास मोहीम सुरू केली होती. पहिले दोन दिवस कोळसा खाणीची माती खोदून तपासणी करण्यात आली. मात्र यामध्ये काहीही आढळून आले नाही. तपास मोहीम योग्य नसल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी आंदोलनाच्या माध्यमातून खाण बंद करण्याचे संकेत दिले होते. प्रशासन कृतीत उतरले आणि मंगळवारी दुपारी डम्पिंग यार्डच्या आवारात सोहेलचा मृतदेह सापडला. मृतदेहाची माहिती मिळताच कुटुंबीय व कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह बाहेर न काढण्याची जबाबदारी घेतल्यावर एरिया कार्मिक व्यवस्थापकाने नियमानुसार नोकरी आणि नुकसान भरपाई देण्याचे लेखी पत्र दिले आहे. आता शवविच्छेदनानंतर सोहेलच्या मृत्यूचे कारण समोर येईल. वेकोलिचा एक सुरक्षा रक्षक बेपत्ता झाला आणि त्याचा मृतदेह 5 दिवसांनंतर वेकोलि परिसरातील डम्पिंग यार्डमध्ये मिळाल्याने वेकोलिच्या सुरक्षा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी करीत आहेत.
#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #death
#chandrapur #rajura #wcl #ballarpurarea #sastiopencastmoneproject
#GMofficeballarpurarea ##securityguard #policestationeajura #Coal #scrap #diesel #thieves
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.