Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारपूर पोलिसांची रेती तस्करांवर कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन ट्रॅक्टर जप्त आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल्लारपूर (दि.१० मे २०२४) -         बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथून पोलिसांनी गस्तीदरम्यान र...

तीन ट्रॅक्टर जप्त
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि.१० मे २०२४) -
        बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथून पोलिसांनी गस्तीदरम्यान रेतीने भरलेले 3 ट्रॅक्टर जप्त केले. पोलिस स्टेशनचे अधिकारी आसिफ राजा शेख यांच्यासह पोलिस कर्मचारी गजानन डोईफोडे गस्त घालत होते. विसापूर घाटात कोलगाव जवळ काही ट्रॅक्टर रेती तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोलगाव - विसापूर रस्त्यावर रेतीने भरलेले काही ट्रॅक्टर येताना दिसले असता त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. रेती चोरून खासगी लोकांना विकली जात असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये 15 हजार रुपये किमतीची रेती आणि प्रत्येक ट्रॅक्टरमधील 7 लाख रुपयांचा माल असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी बंडू जनार्दन कोवे, राजू देवराम टेकाम, रवी गटय्या आधे, सागर चंकुजी कोडापे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि खाण विकास आणि नियोजन निर्बंध, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान इत्यादी कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्री ९.४५ वाजता करण्यात आली. वरील कारवाई एसएचओ आसिफ राजा शेख, सपुनी पांडे, पीएसआय लोखंडे, सफौ गजानन डोईफोडाई, पुहवा वामन शेंडे, विकास बाबा, खरात, कैलास, प्रकाश, मडावी यांनी केली.

#aamchavidarbha
#vidarbha
#chandrapur #ballarpur
#retitaskari #sandsmagling
#ballarpurpolicestation #visapur
#court  #tractorconfiscated

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top