Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बी.यु. बोर्डेवार तर सचिवपदी बादल बेले यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुका पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 22 एप्रिल 2024) -         राजुरा तालुका पत्रकार ...

राजुरा तालुका पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 22 एप्रिल 2024) -
        राजुरा तालुका पत्रकार संघाची सन 2024-2029 करिता कार्यकारणी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये अध्यक्ष म्हणून बी.यु. बोर्डेवार, कार्यवाहक अध्यक्ष उमाकांत आबाजी धोटे, उपाध्यक्ष प्रवीण गोपाळराव देशकर, सचिव बादल नीलकंठ बेले, सहसचिव बाबा अन्वर बेग, कोषाध्यक्ष गणेश जयराम बेले, सदस्य म्हणून आनंद शिवराम भेंडे, मसुद अहमद शेख अहमद, राजेंद्र दत्तात्रय मोरे, आनंद दादाजी चलाख, नितीन रामचंद्र मुसळे यांची बहुमताने निवड झाली. या निवडणुक प्रक्रियेत अँड. मनोज काकडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मानून भूमिका पार पाडली. नवनियुक्त विजयी उमेदवारांना विजयी झाल्याबद्दलचे रीतसर प्रमाणपत्र देण्यात आले. नवनियुक्त कार्यकारणीच्या वतीने पत्रकार संघ अनेक सामाजिक, शैक्षणिक, तसेच अन्यायग्रस्त, गरजू लोकांच्या भूमिका अत्यंत प्रखडपणे मांडेल असा विश्वास अध्यक्ष भीमय्या बोर्डेवार व सचिव बादल बेले यांनी यावेळी व्यक्त केला. आभार बादल बेले यांनी मानले. (Bhimaya Bordewar) (Badal Bele) (aamcha vidarbha) (vidarbha) (patrakar) (rajura)

 #Election
22 Apr 2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top