Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अंबुजा सिमेंट मधिल कामगारांच्या मृत्यूची चौकशी करा : आ. सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोषी कारखाना प्रमुख व कंत्राटदारांवर ३०४ अ दाखल करण्याची ही मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २४ एप्रिल २०२४) -         अडाणी उद्यो...

दोषी कारखाना प्रमुख व कंत्राटदारांवर ३०४ अ दाखल करण्याची ही मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २४ एप्रिल २०२४) -
        अडाणी उद्योग समूहाच्या अंबुजा सिमेंट लिमिटेड उपरवाही या कारखान्यांमध्ये दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी अविनाश चौधरी या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. या आधीही रवींद्र सुरकर, मारुती धनवलकर यांचे मृत्यू झालेत. एकाच वर्षात तीन कामगार मृत्युमुखी पडलेत. अल्ट्राटेक सिमेंट अवारपुर व अल्ट्राटेक सिमेंट युनिट माणिकगड सिमेंट गडचांदूर तसेच दालमिया भारत सिमेंट नारंडा या तीन कारखान्याचे तुलनेमध्ये सुरक्षेच्या व सुरक्षित वर्क प्लेसच्या बाबतीत अंबुजा सिमेंट लिमिटेड उपरवाही हा उद्योग मागासलेला दिसून येत आहे. (Ambuja Cement)

      या कारखान्यांमध्ये सतत होणाऱ्या कामगारांच्या मृत्यू वरून हे सिद्ध होत आहे की या कारखान्याचे फॅक्टरी एक्ट अनुसार असलेले फॅक्टरी मॅनेजर व त्यांच्यासोबत काम करणारे ठेकेदार यांना कामगारांच्या जीवित हानी बाबत कसलेही देणे घेणे नाही. यामुळेच या कारखान्यात लागोपाठ कामगारांचे अपघाती व नैसर्गिक मृत्यू सातत्याने वाढलेले आहेत. याला एकच कारण आहे ते असे की, कमी वेळात जास्त काम करून घेणे, कमी मैनपावर मध्ये कामगारावर जास्त वर्कलोड देऊन काम करून घेणे, जे कामगार ज्या कामासाठी नियुक्त केले जातात व ज्या कामाची दैनंदिन मजुरी त्यांना मिळते त्या व्यतिरिक्त हायस्किल्ड दर्जाचे काम आणि अनस्किल्ड कामगारांकडून करून घेणे आणि त्यामुळे  अनुभवाची कमतरता दिसून येत असल्याने ते क्षमतेने काम करू शकत नाहीत अशा परिस्थितीत त्यांना आपला नाहक जीव गमवावा लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

      कामगारांचा जीव जातो त्याच्या परिवाराला आर्थिक मदत करून कंपनी आपली जबाबदारी झटकू शकत नाही. अलीकडच्या काळात असुरक्षित कार्यस्थळ मोठ्या प्रमाणात कारखान्यात निर्माण झालेले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. 

        उप संचालक ओद्योगिक स्वास्थ व सुरक्षा महाराष्ट्र शासन यांनी नुकतेच अंबुजा सिमेंटच्या सर्वेक्षणातून तसी नोंद घेतल्याची माहिती आहे. आम्ही ह्या अपघात प्रकारणाची गंभीर दखल घेतलेली असून शासनाच्या तज्ञ अधिकारी यांची विशेष समिती नेमून अंबुजा सिमेंट लिमिटेड उपरवही या कारखान्याचे औद्योगिक स्वास्थ व सुरक्षा संबंधित सूक्ष्म निरीक्षण करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा व दोषी कारखाना प्रमुख यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे प्रकरण हस्तांतरित करावे या प्रमुख मागनीचे पत्र संचालक औद्योगिक स्वास्थ व सुरक्षा संचनालय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई यांचेकडे आपण सादर करणार आहोत अशी माहिती आमदार सुभाष धोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. (MLA Subhash Dhote)

प्रतिबंधित कामे कॉन्ट्रेक्टर कडून डीजीएमएस नागपुर यांचे दुर्लक्ष
           केंद्र शासनाने लाइमस्टोन माइंस येथे कॉन्ट्रेक्टर द्वारा कामे सक्तीचे वर्जित केले आहे तसा सरकारी अध्यादेश आहे परंतु खाण सुरक्षा संचालनालय नागपुर येथील अधिकारी आर्थिक लाभ घेऊन लाईमस्टोन माइंस मध्ये ठेकेदारी मार्फ़त कामे करण्यास मुभा देत आहेत. यासाठी मुख्य महानिदेशक खाण मुख्यालय धनबाद यांना ह्या संदर्भात चौकशी करून अहवाल लवकरच मागवनार असल्याचे त्यांनी सांगितले. (aamcha vidarbha) (vidarbha) (rajura)
24 Apr 2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top