Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: गडचांदूरात एका आठवड्यात पोस्को अंतर्गत दोन गुन्हे दाखल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोपी बॉडी बिल्डर अनीस खान व मुनीर सादिक शेख यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या आमचा विदर्भ - गडचांदूर (दि. १७ जानेवारी २०२४) -         गडचां...

आरोपी बॉडी बिल्डर अनीस खान व मुनीर सादिक शेख यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
आमचा विदर्भ -
गडचांदूर (दि. १७ जानेवारी २०२४) -
        गडचांदूरात एकाच आठवड्यात पोस्को अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी दोघाही आरोपींचा मुसक्या आवळल्या आहे. पहिल्या घटनेत गडचांदूर येथील पुरस्कार प्राप्त आरोपी बॉडी बिल्डर अनीस खान (२८) याने सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे व्हिडीओ ठेऊन तिचा बद्दल लिहिले होते. काही दिवसानंतर त्याचा मित्राने सोशल मीडियावर तेच व्हिडीओ पोस्ट केले. याबद्दल माहिती मिळताच पोलिसात तक्रार करण्यात आली. मित्राने व्हिडीओ अनीस खान याचे सोशल मीडियावरून घेतले असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बॉडी बिल्डर आरोपी अनीस खान (२८) याला अटक केली असुन त्याच्यावर आयटी एक्ट व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अनीस खान ला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला १५ दिवसाचा एमसीआर देण्यात आला. (Accused body builders Anees Khan and Munir Sadiq Shaikh were arrested by the police)

        काही दिवसापूर्वी दुसऱ्या घटनेत नवव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या विवाहित एसटी बस वाहका विरुद्ध गडचांदूर पोलिसात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिवती तालुक्यातील एका १४ वर्षाची विद्यार्थिनी गडचांदूर येथे शिकत आहे. ती दररोज एसटीने यायची, एसटी बस वर वाहक म्हणून असलेला मुनीर सादिक शेख हा तिच्या सोबत तथाकथितपणे नेहमी बोलत असल्याने त्यांची ओळखी वाढली. काही दिवसानंतर मुनीर ने तिला प्रपोज केले. मात्र त्या विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र शाळेत एसटी बसने येणे जाणे करावे लागत असल्याने दोघात बोलचाल व्हायची. एकेदिवशी तो तिला भेटासाठी शाळेकडे दुचाकी घेऊन आला. दि. १० ला दुपारी लवकर सुट्टी झाली आणि तो शाळेजवळ दुचाकी घेऊन मुलीची वाट पाहत उभा होता. शाळेला सुट्टी होताच त्याने तथाकथितपणे मुलीला दुचाकीने सोडण्याच्या बहाण्याने बसविले दोघेही विसापूर मार्गे जात असल्याचे गावातील नागरिकांना दिसले. याबाबत मुलीच्या आईला माहित होताच गडचांदूर पोलीस गाठून एक विवाहित पुरुष माझ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करीत असल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली. पोलिसांनी आरोपी मुनीर सादिक शेख (३२) याला अटक केली असुन त्याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्यातरी सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती बघता आरोपी एका विशिष्ट समाजाचे असल्याने चर्चेला उधाण आले आहे. महिलांच्या बाबतीत अश्या घटना घडत असताना नागरिकांत प्रचंड रोष असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. (aamacha vidarbha) (gadchandur) (Police Station Gadchandur) 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top