Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्पाच्या सेक्शन 4चा मार्ग मोकळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कामगार नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात झालेल्या काम बंद आंदोलनानंतर वेकोलीने दिले लेखी आश्वासन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 15 डिस...

कामगार नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात झालेल्या काम बंद आंदोलनानंतर वेकोलीने दिले लेखी आश्वासन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 15 डिसेंबर 2023) -
        गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्पाच्या सेक्शन 4चा मार्ग मोकळा झाला असून येत्या 3 महिन्याच्या आत प्रस्ताव पाठवण्याचे लेखी आश्वासन वेकोली बल्लारपूर तर्फे देण्यात आले. कामगार नेते बबन उरकुडे (Labor leader Baban Urkude) यांच्या नेतृत्वात गोवरी, गोयेगाव, माथरा, मूठरा येथील असंख्य प्रकल्पग्रस्त एकत्र येत गोयेगाव साईडिंग येथील मुख्य रस्ता अडवून धरत 2 तास काम बंद आंदोलन पुकारले. याचीच धास्ती घेत क्षेत्रीय मुख्य प्रबंधक बल्लारपूर यांनी लेखी आश्वासन देत परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रदूषण नियंत्रणाबाबत आणि सुरक्षेबाबत वेकोलि कटिबद्ध असल्याचे नमूद केले. वेकोलि अधिकारी चक्रवर्ती यांच्या मध्यस्थीने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (WCL gave the written assurance after the strike led by labor leader Baban Urkude)

        याप्रसंगी तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, रमेश झाडे, मारोती चन्ने, गोयगाव चे सरपंच बंडू कोडपे, उपसरपंच स्नेहल पडवेकर, गोवरी ग्रामपंचायत सदस्य चेतन बोबाटे, अखिल लोनगाडगे, शुभम जूनघरी, मंगेश पहानपाटे, सूरज अलुआलू, संतोष चन्ने, बाबुराव पा.चन्ने, धीरज सातपुते, साईनाथ लांबट प्रमोद पान्हपटे, सूरज लांडे, गोलू ऊरकुडे, सचिन विद्ये, द्यानेशवर दरेकर, विननाथ जिवतोडे श्यासुंदर उईके, तेजराव पा. गौरकार रजकिरण पिपरे सुभाष वाढई, झाडे गोएगाव, पायपरे गोयगाव व शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura) (wcl ballarpur area)

15 Dec 2023

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top