Home
»
राजुरा
» आधुनिक भारताच्या नवनिर्माणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान : आमदार सुभाष धोटे
आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२३) -
तालुका काँग्रेस कमीटी राजुरा च्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यातील आर्वीचे सरपंच सुरज माथनकर, चार्लीचे सरपंच विजय निवलकर, उपसरपंच सचिन धांडे, ग्रामपंचायत सदस्य आर्वीचे अंकुश मस्की, दिलीप डाखरे, प्रफुल उपरे, मारोती आसमपल्लीवार, गीरजाबाई शिवनकर, शालू येल्लुरे, प्रियंका थेरे, विद्या माथनकर, रामपूरचे शरद शेंडे, मायाताई करलुके, सास्ती चे मधुकर झाडे या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, आधुनिक भारताच्या नवनिर्माणात स्व. पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशासमोर अनेक आव्हाने उभी होती त्यावर मात करून मोठ्या हिमतीने आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी हा देश मजबूत केला. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे आणि काँग्रेसचे योगदान राहिले आहे. त्यामुळे त्याच क्रांतीकारी इतिहासाला स्मरून गावागावात आणि शहराशहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून जनसेवेला वाहून घ्यावे, केंद्र आणि राज्यातील हुकुमशाही सरकारचा खोटारडेपणा उघड करावा, काँग्रेसची विकासकामे जनतेच्या लक्षात आनुन द्यावीत असे आवाहन केले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, अॅड. सदानंद लांडे, अशोकराव देशपांडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निर्मला कुळमेथे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, उमाकांत धांडे, नंदकिशोर वाढई, माजी सभापती कुंदा जेणेकर, अभिजीत धोटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने यासह राजुरा तालुक्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, कृ. उ. बा. स. संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ऐजाज अहमद, वि. यु. काँ. चे अध्यक्ष उमेश गोनेलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रा. वि. काँ. चे प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. (rajura) (aamcha vidarbha)
Advertisement

Related Posts
- ''बागेपासून जैविक औषधांपर्यंत – रविवारचे प्रयोग आश्रमशाळेत''21 Sep 20250
‘जल, जंगल आणि जमीन’ची जाणीव लहानपणीच – साळवे सरांचा संदेशआमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २...Read more »
- ''हैद्राबाद गॅझेट नाही तर संविधान सर्वोच्च''21 Sep 20250
२७ सप्टेंबरला राजुरात आदिवासींचा भव्य मोर्चाबंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यास आदिवासीं...Read more »
- श्रद्धा आणि परंपरेच्या उत्सवात गुन्हेगारीची कलमं अन्यायकारक - सुरज ठाकरे21 Sep 20250
गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा न्यायालयीन लढाराजुरा शहरात ७ गणेश मंडळांविरोधात दाखल गुन्ह्...Read more »
- सोशल मीडियावरून ॲड. वामनराव चटप यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट20 Sep 20250
राजुरा व विरूर पोलीस ठाण्यात तक्रार; दोषींवर कठोर कारवाईची मागणी२१ सप्टेंबरला विरूर येथे निषेध आंदोल...Read more »
- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सरकारचे अपयश उघड - डॉ. शरद निंबाळकर19 Sep 20250
राजुरा मुक्तीदिन सोहळ्यात सात सत्कारमुर्तींना “राजुरा भूषण” सन्मानआमचा विदर्भ - अनंता गोखरेराजुरा (द...Read more »
- राजूरा मतदार याद्यांतील अनियमिततेवर राष्ट्रीय नेते राहुल गांधींची टीका19 Sep 20250
काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी केलेले आरोप पोहोचले दिल्लीपर्यंतराजूरा निवडणुकीतील धांधलीचा मुद्दा पुन्ह...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.