Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रोटरी क्लब राजुराच्या नंदीबैल सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. १७ सप्टेंबर २०२३) -         रोटरी क्लब राजुराच्या वतीने साईनगर येथील हनुमान मंदिराच्या भव्य पटा...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. १७ सप्टेंबर २०२३) -
        रोटरी क्लब राजुराच्या वतीने साईनगर येथील हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला तेथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक बालगोपालांनी आपले नंदीबैल खूप चांगल्या रीतीने सजवून आणले होते आणि स्वतःही वेगवेगळी वेशभूषा करून त्यातून सामाजिक संदेश जाईल अशा प्रकारे त्यांनी आपली कलाकृती सादर केली. रोटरी क्लबच्या वतीने बाल गोपालांचा उत्साह द्विगुणित करण्याकरता प्रथम द्वितीय व तृतीय या स्वरूपात अनुक्रमे सायकल,स्टडी टेबल, स्कूल बॅग अशा प्रकारची बक्षिसे देण्यात आली. प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली चेतना भाऊराव कोरडे, द्वितीय ईशान विद्दे, तृतीय स्पृहा उमेश वरघणे यांना वरील बक्षीस देण्यात आली.

        या स्पर्धेचे परीक्षण आसावरी बोनगीरवार, कल्याणी मोहरील, नेहा चिल्लावार,राधा विरमलवार,जया तिवारी यांनी केले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे कमल बजाज, समीर चिल्लावार, मयूर बोनगीरवार, आनंद मोहरील, निखिल चांडक, सुशील कल्लूरवार, आनंद चांडक, सुहास बोबडे, सारंग गिरसावळे, स्नेहा चांडक, प्रीती चांडक, आदित्या कल्लूरवार, पुनम गिरसावळे व प्रभागातील नागरिक संजय गडकरी, प्रकाश रासेकर, आनंदराव ताजने, राहुल रासेकर, शालीक ऊरकुडे, विनोद कोंडेकर, अनंतराव ताजने, संदीप मोरे, राजकुमार चिंचोलकर, सुभाष कावळे, लटारु मत्ते, सुभाष पावडे, सुरेश बोंडे, मनोहर बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top