Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपुरात शिवसेना वाढीसाठी जोमाने कामाला लागा - किरण पांडव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव आढावा बैठकीकरिता जिल्ह्यात आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. ८ जुलै २०२३) -         शिवसेन...

पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव आढावा बैठकीकरिता जिल्ह्यात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. ८ जुलै २०२३) -
        शिवसेना पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचे आदेशाने किरण पांडव (kiran pandav) पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली हिरई गेस्ट सि.टी.पी.एस. येथे चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची (shivsena) सध्यास्थिती जाणून घेवुन जिल्ह्यात शिवसेनेचा प्रचार व प्रसार कसा करता येईल व शिवसेना वाढीसाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी विशेष लक्ष कसे देता येईल याबाबत मार्गदर्शन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचे आव्हान केले. शिवदूत व बुथ प्रतिनिधी तथा प्रत्येक तालुक्याची शिवसेना-युवासेना, महिला आघाडी कार्यकारणी त्वरित तयार करण्यात यावी, अशी मोलाची सूचना केली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका व महानगरपालिका (election) निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधि कसे निवडून येईल व चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष कशा मजबूत होईल याचे सविस्तर मार्गदर्शन किरण पांडव यांनी केले. (East Vidarbha Liaison Chief Kiran Pandav in the district for a review meeting)

        बैठकीत (bandu hajare) बंडू हजारे सहसंपर्क प्रमुख चंद्रपूर, जिल्हाप्रमुख (nitin matte) नितीन मत्ते, सौ. योगिता लांडगे, सुर्या अडबाले यांना सूचना देऊन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या लवकरात लवकर कार्यकारणी तयार करण्यात याव्या व जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी सदैव सोबत उभा राहील अशी ग्वाही दिली. अनेकांचे पक्षप्रवेश नितीन मत्ते चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख यांचे नेतृत्वात व किरण पांडव यांचे मुख्य उपस्थितीत घेण्यात आले. वरोरा तालुक्यातील फत्तापूर ग्रामपंचायत चे उपसरपंच विलास वायदुडे यांनी नितीन मते जिल्हाप्रमुख यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून किरण पांडव यांचे उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यामुळे शिवसेनेला वरोरा तालुक्यात अधिक बळकटी मिळेल अशी आशा किरण पांडव यांनी व्यक्त केली. (chandrapur) (aamcha vidarbha)

        चंद्रपूर तालुक्यामधील राजकीय व माजी पत्रकार संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्त्ता तरुण येनगंटीवार व इतर यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला. तसेच जिवती तालुक्यातील अनेकांनी पक्ष प्रवेश केला. त्याच बरोबर पोंभूर्णा तालुक्यातील सुद्धा अनेकांचा पक्षप्रवेश यावेळी घेतला. यावेळी हर्षल शिंदे युवासेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र, शुभम नवले युवा सेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश, बंडू हजारे सह संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा, सौ योगिता लांडगे महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर, सूर्या अडबाले युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, अरविंद धिमान वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख चंद्रपूर तथा आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर तथा शहर प्रमुख भद्रावती, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, नेताजी गहाणे सिंदेवाही तालुका प्रमुख, नरेन्द्र नरड ब्रम्हपूरी तालुका प्रमुख, मनोज लड़के नागभिड तालुका प्रमूख, पंकज वडेट्टीवार पोंभूर्णा, राकेश राठोड कोरपना, भरत बिरादर जिवती, सचिन गोरे राजूरा, नरेश काळे भद्रावती, श्रीकांत खंगार वरोरा, सुधिर कारंगल चंदपूर, अविनाश उईके, पहानपट्टे, संतोष ढोक, सुंदरसिंग बावरा, राजू सारंगधर, चेतन घोरपडे, अशोक चांदेकर, कल्पना ताई भुसारी उपजिल्हा प्रमुख वरोरा विधानसभा सौ. ज्योती लांदगे, सौ. तृप्ती हिरादेवे, अमोल माकोडे, सागर माकोडे सर्व तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख, महिला आघाडी तालुका प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख, सर्व विभागाचे शहर प्रमुख, उप तालुका प्रमुख व शिवसैनिक या आढावा बैठकीला उपस्थित होते. 
08 Jul 2023

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top