आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर (प्रतिनिधी)
राजुरा (दि. ३ जून २०२३) -
छत्रीपती शिवाजी महाराज जयंतीप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी गुरुदेव सेवा मंडळ प्रतिष्ठान समोर टिनाचे भव्य शेड उभारणार अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने ३ जून रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नेत्या निकिता रमेश झाडे आणि गोवरीच्या सरपंच आशा उरकुडे, मायाबाई मालेकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. (Bhoomipujan of tin shed in front of Gurudev Seva Mandal at Rampur in Rampur on the occasion of birthday)
सामाजिक कार्यात एखादा व्यक्ती स्वतःला किती झोकून देऊन काम करू शकतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या शेडकरीता अंदाजे एक ते सव्वा लाख रक्कमेचा खर्च येणार आहे. रामपूर वासियांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून कुठलीही अपेक्षा न करता कार्य करत राहील असं मत बबन उरकुडे यांनी व्यक्त केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ आणि रामपूर वासियांनी उपस्थित राहून बबन उरकुडे याना शुभेच्छा दिल्या आणि आभार व्यक्त केले. (Rampur - Rajura) (baban Urkude)
शिवसेनेच्या माध्यमातून सतत रामपूर संबंधित समस्यांवर लक्ष ठेवल्या जात असून जनसंपर्क सुद्धा वाढला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये पण धास्ती पोहचली आहे. रामपूर ग्रामपंचायतीवर सध्या भाजप-संघटनेची सत्ता असली तरी पुढील निवडणुकीत सरपंच पद हे महिला अनुसूचित जाती करिता राखीव येईल अशी चर्चा असल्याने समाजसेवेकरीता नेहमी धावून जाणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले शिवसेना उपतालुका प्रमुख, ग्राम पंचायत सदस्य रमेश झाडे यांची पत्नी निकीता झाडे यांना सामोरे करून शिवसेने निवडणुकीची तयारी सुरु केली कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.