Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भरधाव हायवाच्या धडकेने ७ जनावरे ठार, ४ जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंनी हायवा मालकाला धरले धारेवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिली मदत आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. २ जून २०२...
आमदार सुभाष धोटेंनी हायवा मालकाला धरले धारेवर
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिली मदत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २ जून २०२३) -
        ग्रामपंचायत सोनापुर अंतर्गत येणाऱ्या सोनापूर फाट्या लगत पाटण मार्गे गडचांदुर कडे येणारी भरधाव हायवा वाहन क्र. एमएच ३४ डिझी ९९७५ समोरून येणाऱ्या पाळीव प्राणी बैलं-गाई आणि वासरू च्या कळपाला जोरदार धडक दिल्याने २ बैलं, ४ गाई, १ वासारूचा जागीच मृत्यू झाला तर ४ बैलं जखमी झाले. घटनास्थळी शेतकऱ्यांमार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार सुभाष धोटे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस निरीक्षक आणि पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तात्काळ पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. (MLA Subhash Dhote held the Haiwa owner on edge) (Subhash Dhote)

         त्यानंतर आ. धोटे यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ  काढून घटनास्थळी दाखल होत हायवा चालक मालकाला धारेवर धरले. नुकसानग्रस्त आशिष मडावी १ बैल, राजीव गेडाम १ गाय, सागर कन्नाके २ गाय, १ वासरू, विलास जगरवार १ गोरा , धर्मा किन्नाके, नागू वेडमे, विशेषराव अत्राम, विठ्ठल अचालवार यांना हायवा मालकाकडून तातडीची नुकसान भरपाई मिळवून दिली. सर्व नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले. तसेच या घटनेवर कार्यवाही करून शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रसंगी सरपंच जगू येडमे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, उप पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम, सुधीर जाधव, पशुधन विकास अधिकारी नरसिंग तेलंग, संदिप राठोड, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दीपक नागले, पशुधन परिवेक्षक धेंगडे, पोलिस पाटील संतोष सलाम, अनिल मडावी, नजू शेख यासह स्थानिक शेतकरी बांधव उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top