Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खबरदार होळी व धुलीवंदनच्या पार्श्वभुमीवर दारू पिऊन गाडी चालवलात तर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या चालकाविरुद्ध कठोर कारवाई करणार - पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिन...
मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या चालकाविरुद्ध कठोर कारवाई करणार - पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ६ मार्च २०२३) -
        होळी व धुलीवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल यासाठी शहरात विविध ठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात येणार आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या शांतता समिती च्या बैठकीत दिली. होळी व धुलीवंदन सण शांततेत साजरा करावा. मिरवणुकीत कुणीही मद्यप्राशन करणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी असे आवाहन ठाणेदार शिंदे यांनी केले. 

        मद्यपी वाहनचालक, स्टंटबाजी करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. सभेला विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top