Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोविड काळातील रुग्णसेवेची दखल घेत गावकऱ्यांनी केला डॉ. भंडारी यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सास्ती येथे श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्र...
सास्ती येथे श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी
राजुरा (दि. १० डिसेंबर २०२२) -
        सास्ती येथे श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. यादरम्यान ग्रामसफाई, भजन कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, श्री. दत्त जयंती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी सास्ती गावातील देवदूत डॉ.बी.के. भंडारी यांचा ग्रामवासियांनी शाल, श्रीफळ व ग्रामगीता पुस्तक देऊन जाहिर सत्कार केला. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक ग्रामीण व शहरी भागातील रुग्णाची (Rural and urban patients) सेवा करण्यात डॉ. भंडारी (Bhandari) हे आघाडीवर होते. नाममात्र शुल्क घेऊन आजही ते रुग्णसेवा करतात. अनेक गरजू गरिबाकडून तर शुल्कही घेत नाही. सास्ती (sasti) सारख्या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षापासुन डॉ. भंडारी आपली आरोग्य सेवा अविरतपणे देत आहेत. कोरोना काळात होणाऱ्या आर्थिक लुटीत सुद्धा डॉ. भंडारी यांनी आपली नाममात्र शुल्कात रुग्णसेवा दिली. अनेकांना मानसिक आधार देऊन आरोग्यसेवा देऊन रुग्णाना बरे करण्यात भंडारी यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सास्ती येथील श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. भंडारी यांचा यथोचीत गुणगौरव केला. यावेळी विलास बुटले, संजय वैरागडे, रामाजी घटे, मारोती चोखारे, दिपक डेरकर, आनंदराव लांडे, पंकज कुडे, गणपत काळे, गजानन भोगेकर, रोहित वैरागडे, वारलू खवसे, मारोती लांडे, सुधाकर जीवतोडे, राहुल कोडापे, उद्धव लोहबडे, वासुदेव बुटले, रमेश लांडे, वासुदेव नांदेकर, इंदिराबाई कुडे, नलिनी लांडे, राजश्री राजुरकर, अंकिता गाडगे, मायाबाई अवचट,  श्रुती मोहितकर, सुवर्णा मोहितकर, छाया मोहितकर, भारती मोहितकर, सईबाई काळे, रुक्माबाई काळे, शकुन पिंपळशेंडे, विना पिंपळशेंडे, निरंजना नागोसे, रेखा मोहितकर, शशीकला नागोसे, सुरेखा लांडे, रजनी लांडे यांच्यासह सास्ती ग्रामवासी मोठयासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. (Shri Dutt Jayanti) (Venerable Rashtrasant Tukdoji Maharaj's death anniversary)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top