Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: द बर्निंग ट्रेन - मोठा अनर्थ टळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर शालिमार एक्सप्रेसला आग सर्व प्रवासी सुखरूप आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी नाशिक -         नाशिक रोड रेल्वे स्थान...
नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर शालिमार एक्सप्रेसला आग
सर्व प्रवासी सुखरूप
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
नाशिक -
        नाशिक रोड रेल्वे स्थानकावर द बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. स्थानकावर गाडी थांबलेली असताना सकाळी 8.43 वाजता शालिमार एलटीटी एक्सप्रेसच्या लगेजच्या डब्यात आग लागली. यावेळी रेल्वे प्रशासनाने लगेजचा डबा प्रवासी डब्ब्यापासून वेगळा केला. तो संपुर्ण डबा जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे.
        मुंबईकडे येणारी हावडा एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी होती. यावेळी सकाळी 8.30 वाजता अचानक आग लागली. नाशिक स्थानकावर सर्वत्र धुराचे लोट पाहण्यास मिळत आहेत. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकाच गोंधळ उडाला. रेल्वेतील प्रवासी चांगलेच धास्तावले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. प्रवाशांनी पटापट जीवमुठीत घेऊन रेल्वेतून बाहेर उड्या मारल्या.
        आग लागल्याचे माहिती मिळताच लगेचच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत पुढचा अनर्थ टळेल, याची खात्री केली. दरम्यान महिनभरापूर्वी नाशिकमध्ये खासगी बसला आग लागल्याची घटना घडली होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top