Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बाळासाहेबांची शिवसेना पक्षात शेकडो युवकांचा प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व बंडू हजारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो युवकांचा प्रवेश आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी चंद्रपुर -       ...
जिल्हाप्रमुख नितीन मत्ते व बंडू हजारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो युवकांचा प्रवेश
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपुर -
         राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत. 

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात चंद्रपूर जिल्हयातील अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी  6 नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हा कार्यालय पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या आदेशानुसार सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांनी पक्षात प्रवेश केला. तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला आशिष ठेंगणे, नरेश काळे, बल्लारपुर विधानसभा उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, कैलाश कापगाते तालूका प्रमुख सावली, राजूभाऊ सारंगधर नगरसेवक, चेतन घोरपडे उपस्थित होते.

        शिवसेनेचे नेता तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जनसामान्य, शेतकरी, कामगार, बेरोजगार व सर्व समाजासाठी काम करण्याची शैली पाहून चंद्रपूर जिल्हा हा बाळासाहेबांची शिवसेना मय होताना दिसत आहे. नितीन मत्ते यांच्या नेत्तृत्वात जिल्हात उदंड प्रतिसाद मिळताना दिसत असून अनेक समाजसेवेचे व्रत घेतलेले कार्यकर्ते समाज हिताचे काम करण्याकरिता एकत्र येताना दिसत आहे. यावेळी हरमेलसिंग रंजीतसिंग डांगी गोंडपिपरी, ग्रापं सदस्य मनिषा मोरे, देवचंद मडावी, सुरेश पेंदोर बेरडी, सचिन गोरे, किशोर ढवळे पडोली, राजु रायपुरे उर्जानगर, अमित शहारे दुर्गापुर, खुशाल भालेराव, चेतन घोरपडे भद्रावती, सचिन पावडे बल्लारपुर, उमेश कुंडले बल्लारपुर, बालाजी सातपुते मानोरा, अरविंद धीमन, अनुराग शर्मा, निलेश गंपावार, अनंत गोखले, आनंद मस्की, प्रफुल्ल चौधरी, कैलाश कापगते, निखिल शेंडे, समीर शेख, अक्षय देवाळकर, सहब शेख, शफीक सय्यद, अंकित रागिट, अमीर कुरैशी यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. 

        उपस्थित मंचावर पदाधिकाऱ्यांनी सर्वाना पक्ष वाढीसाठी सूचना देवून कामाला लागण्याचे आवाहन केले. प्रवेश केलेल्या तालुक्यातील पदाधिकारी लवकरच नियुक्त करण्यात येईल तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यातील असंख्य ग्रापं सदस्य बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश लवकरच प्रवेश घेणार असून ग्रामीण भागात सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना कशी वाढेल यासाठी मंथन करण्यात आले. यावेळी बैठकीला जिल्हातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
07 Nov 2022

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top