Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलि नागपूर क्षेत्रात शैक्षणिक योग्यतेनुसार अर्ज करण्याची सूचना जारी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांनी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांचेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी ...
अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांनी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांचेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
राजुरा -
        भाजपा तालुका महामंत्री अँड.इंजि. प्रशांत घरोटे (prashant gharote) यांनी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर (Former Minister of State for Home Hansraj Ahir) यांचे कडे केलेल्या पाठपुराव्या नुसार वेकोलि (wcl) परिसरातील कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या (As per educational qualification) देण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. २०१६ मध्ये वेकोलित काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नौकरीत घेण्याचा निर्णय झाला होता आणि त्यानुसार २०२१ पर्यंत शैक्षणिक योग्यतेनुसार नियुक्त्यापण देण्यात आल्या परंतु नवीन एसओपीच्या नावाखाली चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्तांना गेल्या वर्षभरापासून त्यांच्या भूसंपादन क्षेत्राव्यतिरिक्त इतर भागात, विशेषत: नागपूर परिसरातील भूमिगत खाणींमध्ये नोकरी देण्यात आली आहे. (Underground mines) या संदर्भात भाजपा तालुका महामंत्री अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांनी गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अहिर यांनी सुद्धा वेकोलिच्या मुख्यालयात वेळोवेळी बैठका घेतल्या. 

        वेकोलि व्यवस्थापनाच्या मनमानी धोरणामुळे त्याची अंमलबजावणी झाली नाही. अखेर अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांचा पाठपुरावा आणि हंसराज अहिर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वेकोलितील उच्चशिक्षित प्रकल्प कामगारांचे हिरावून घेतलेले हक्क बहाल करण्याचा निर्णय वेकोलि मुख्यालयाला घ्यावा लागला. 

स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी घरोटे यांनी अहिर यांचेकडे केला होता पाठपुरावा
        सन २०२१-२२ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील पौनी-३, एकोना व इतर खाणीतील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देताना वेकोलिने या निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याने अहिर यांनी नागपूर वेकोलि मुख्यालयाच्या nagpur wcl head qaurter बैठकीत या विषयावर चर्चा केली. त्यामुळे नागपूर क्षेत्रातील तांत्रिक शिक्षित कामगारांनी क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक, नागपूर यांच्याकडे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयटीआय, अभियांत्रिकी (पदवीधारक), फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एलएलबी व इतर उच्चशिक्षित कामगारांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. अश्याच प्रकारच्या सूचना वेकोलिच्या इतर क्षेत्रात सुद्धा जारी कराव्या अशी सूचना अहिर यांचे कडून करण्यात आली आहे.
23 Nov 2022

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top