Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: उपरवाही येथे कांग्रेस व शेतकरी संघटना प्रणीत ग्रामविकास युवा आघाड़ीचा दनदनित विजय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कांग्रेस पक्षाचे सरपंच व ४ तर शेतकरी संघटनेचे ३ सदस्य विजयी विजय क्रांति क़ामगार संघटनेचे नेते विजय ठाकरे ठरले विजयाचे शिल्पकार काँग्रेस आणि...
कांग्रेस पक्षाचे सरपंच व ४ तर शेतकरी संघटनेचे ३ सदस्य विजयी
विजय क्रांति क़ामगार संघटनेचे नेते विजय ठाकरे ठरले विजयाचे शिल्पकार
काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढून केला जल्लोष
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
        नुकतेच जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील औद्योगिक ग्राम पंचायत उपरवाही येथे कांग्रेस पक्षाचे सरपंच व चार सदस्य तसेच शेतकरी संघटनेचे उपसरपंच पदाचे दावेदार सह अन्य दोन सदस्य असे ऐकुन आठ सदस्य निवडून आले.  उपरवाही येथील ग्राम पंचायत निवडणुकीत एकुण सदस्य संख्या 9 आणि सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. कांग्रेस पक्षाचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात त्याच प्रमाणे उत्कृष्ट संसद पटु माजी आमदार वामनराव चटप यांचे मार्गदर्शनात व विधानसभा समन्वयक अरुण धोटे यांच्या अनुभवातुन घवघवित यश मिळाले.
 
        या निवडणुकीत कांग्रेसच्या सौ. गिताताई साईनाथ सिडाम ह्या सरपंच पदी निवडुन आल्या तर सदस्य पदासाठी सौ. ज्योति सचिन चिकराम, सौ. पंचफूला बापूजी काकड़े, सौ. मनीषा अनिल मेश्राम व श्री शंकर भाऊराव गुरुकुण्टवार असे पाच तर शेतकरी संघटनेचे गोविंदा गेडाम, अनिल कौरासे व सौ. प्रतिभा संतोष आत्राम असे एकुन तीन सदस्य विजयी झाले. 

        ह्या निवडणुकीत कामगार नेते विजय ठाकरे यांच्या नेतृत्वात विजयक्रांति संघटना ने विजय मिळवून देण्यासाठी आवर्जून प्रयत्न केले. एकही उमेदवार पडणार नाही याची काळजी घेण्यात आली. या निवडणूकित विजय मिळविण्याकरिता बबन आत्राम महासचिव विजयक्रांति कामगार संघटना, अभय जवादे युवा नेता युवक कांग्रेस, नरसिंह एमुलवार, दिलीप ठमके, मानसिंह पांचाल, बालू काकड़े, सुधाकर वाड़की, आशीष पिंपळकर, धनराज पिम्पलशेन्डे, मुकेश पोटे, प्रवीण डाखरे, दिनेश काले, सागर ठमके इत्यादिनी परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top